नितीश कुमार मोदींच्या पाया का पडले?, ‘या’ 4 कारणांची जोरदार चर्चा

Nitish Kumar | नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए आघाडी पुन्हा एकदा केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी तयार झाली आहे. आज (7 जून) दिल्लीत एनडीएच्या घटक पक्षांची महत्वाची बैठक झाली. नरेंद्र मोदी यांची आज एनडीएच्या नेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी दोन घटनांनी देशाचे लक्ष वेधले. याची आज दिवसभर चर्चा झाली.

यावेळी बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दलाचे (संयुक्त) अध्यक्ष नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतुक केले. इतकंच नाही तर, यावेळी त्यांनी थेट आशिर्वादासाठी नरेंद्र मोदींचे पाय धरले. तर मोदी संविधानासमोर नतमस्तक झाले. या दोन घटनांची देशभर चर्चा झाली.

बिहारमधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही नितीश कुमार यांनी अशीच कृती केली होती. त्यांनी चर्चा सुरु असताना मोदींचे पाय धरले होते. आज पुन्हा ते मोदींच्या पाया पडले. या घटनेमुळे विरोधी गटांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजकीय वर्तुळात यामागे आता वेगळीच तर्क लावली जात आहेत.

नितीश कुमार यांच्या या कृतीमुळे ते एनडीएमध्येच राहणार असल्याचं त्यांनी दाखवून दिलं आहे. मात्र, त्यांनी मोदींचे पाय धरल्याने देशभरात या घटनेची एकच चर्चा झाली. वयाबद्दल बोलायला गेलं तर, मोदी आणि नितीश कुमार यांच्यात फक्त 6 ते 7 महिन्यांचे अंतर आहे. आता राजकीय वर्तुळात चार गोष्टींबाबत सध्या बोललं जातंय.

इंडिया आघाडीकडून कमी अपेक्षा

नितीशकुमार (Nitish Kumar )हे सत्तेमधील अत्यंत हुशार खेळाडू आहेत. इंडिया आघाडी अजूनही सत्तेपासून दूर आहे हे त्यांना फार पूर्वीच कळून चुकले होते. त्यामुळेच संधी पाहून त्यांनी एनडीएकडे मोर्चा वळवला. त्यांना माहित आहे की, इंडिया आघाडीत पंतप्रधान आणि उपपंतप्रधानपदासाठी जोरदार लढत आहे. त्यामुळे त्यांना इंडिया आघाडीकडून फार कमी अपेक्षा असल्याचं म्हटलं जातंय.

एनडीएसोबत मोठी डील झाली?

नितीश कुमार यांनी भाषण देताना बिहारच्या विकासात काय बाकी आहे यावर भाष्य केले. बिहारची प्रलंबित प्रकरणे पूर्ण होतील, त्यांच्या या एका वाक्याने त्यांच्यात काहीतरी डील झाल्याचं म्हटलं जातंय. अलीकडच्या काही दिवसांपासून बिहारच्या राजकारणात अशी जोरदार चर्चा सुरू आहे की, नितीशकुमार (Nitish Kumar ) यांच्या मुलाचे देखील राजकारणात पाय रोवायचे आहेत. कदाचित या संदर्भात प्लॅन बी तयार झाला असेल, असं म्हटलं जातंय.

मोदी आणि नितीश कुमार यांचे जुने संबंध

नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांचे संबंध खूप चांगले आहेत.नितीश कुमार वेळोवेळी नाराज झाले आहेत. पण यामागचे कारण नेहमी राजकीय फायदा राहिला आहे. यामागे व्यक्तिगत कारण कधीच राहिले नाही. 2002 मध्ये गुजरात दंगलीमुळे जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मोदींचा राजीनामा मागितला होता, तेव्हा नितीशकुमार यांनी गप्प राहून आपल्या मित्राला मदत केली. बिहार 2021 च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूच्या जागा कमी आल्यानंतरही नितीश कुमार (Nitish Kumar ) मुख्यमंत्री झाले तेव्हा देखील नरेंद्र मोदी त्यांच्या मागे होते.

नितीश कुमार यांना हवाय मान-सन्मान?

नितीश कुमार अद्याप राजकारणातून संन्यास घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. 2024 च्या निवडणुकीचे भवितव्य त्यांनी आधीच पाहिले आहे. त्यांना माहित आहे की, त्यांच्या पक्षाचे मूळ मतदार भाजपमध्ये अधिक सुरक्षित आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नितीशकुमार राजदसोबत राहिले तर त्यांना एवढे मोठे यश मिळणार नाही, अशी शक्यता होती. कदाचित यामुळेच राजद नेहमीच जेडीयूला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलंय.

आरजेडीसोबत सरकारमध्ये असतानाही तेजस्वी आणि लालू यादव नितीशकुमारांना त्रास देत राहिले. बिहार सरकारच्या सर्व कामाचे श्रेय तेजस्वी यांनी घेतले. मागच्या वेळी जेव्हा नितीश कुमार महाआघाडी सोडून एनडीएमध्ये सामील झाले तेव्हा तेजस्वी आणि आरजेडीच्या ट्विटर हँडलने नितीश कुमारांच्या (Nitish Kumar ) विरोधात खूप काही लिहिले होते. ही गोष्ट नितीश कुमार कधीच विसरणार नाहीत. त्यामुळे आता ते आपला मान-सन्मान बघतील, असं म्हटलं जातंय.

News Title –  Why Nitish Kumar bow down at the feet of Narendra Modi
महत्त्वाच्या बातम्या-

‘मासे न खाताच…’; वसंत मोरेंनी राज ठाकरेंना डिवचलं

‘जेव्हा माझ्यावर वाईट वेळ येईल तेव्हा…’; सलमान खानचं वक्तव्य चर्चेत

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांनंतर उपमुख्यमंत्री पदासाठी ‘या’ नेत्याचं नाव चर्चेत

कंगनाच्या कानाखाली लगावणाऱ्या CISF महिलेला थेट बॉलिवूडकडून ऑफर

“बरं झालं शिवरायांच्या काळात…”, शरद पोंक्षे यांच्या वक्तव्याने वाद पेटण्याची शक्यता