अक्षय शिंदेवर गोळी चालवणारा पोलीस ऑफीसर कोण?, महत्त्वाचं कनेक्शन समोर

On: September 24, 2024 11:58 AM
Akshay Shinde Encounter
---Advertisement---

Akshay Shinde Encounter l गेल्या काही महिन्यांपूर्वी बलादपूरमधील शाळेत एका चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. यामधील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा काल (23 सप्टेंबर) संध्याकाळी मृत्यू झाला आहे. यावेळी पोलिसांच्या एनकाऊंटरमध्ये अक्षय शिंदेचा जीव गेला आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण राज्यभर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र आता याप्रकरणाला नवी दिशा मिळाली आहे. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसाच्या रिवॉल्व्हरचा वापर करून गोळीबार केला. मात्र त्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी देखील फायरिंग केले आणि यावेळी या घटनेत अक्षय शिंदे ठार झाला आहे. मात्र आता अक्षय शिंदेवर गोळी चालवणारा तो ऑफीसर नेमका कोण? असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे.

अक्षयवर गोळी चालवणारा ऑफीसर कोण? :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, बदलापूर घटनेतील मुख्य आरोपी अक्षयने पोलीस व्हनमध्ये असतानाचा पोलिसांकडील पिस्तुल हिसकावून गोळीबार केला, मात्र यावेळी इन्स्पेक्टर संजय शिंदे आणि सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर निलेश मोरे हे दोघेही जखमी झाले आहेत. मात्र त्यावेळी गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि आरोपी अक्षयला रोखण्यासाठी इन्स्पेक्टर संजय शिंदे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत गोळी चालवली, त्यामध्ये जखमी झालेल्या अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे.

तर आरोपी अक्षय शिंदेवर गोळी चालवणारे इन्स्पेक्टर संजय शिंदे यांची कारकीर्द चांगलीच चर्चेत आहे. कारण इन्स्पेक्टर संजय शिंदे हे बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी गठीत करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे (SIT) अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षात देखील काम केले आहे. याशिवाय संजय शिंदे यांनी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत देखील काम केलं आहे.

Akshay Shinde Encounter l इन्स्पेक्टर संजय शिंदेंची कारकीर्द :

याशिवाय 1983 मध्ये पोलीस दलात दाखल झालेले एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे प्रदीप शर्मा यांनी आपल्या कारकिर्दीत 100 पेक्षा अधिक गुन्हेगारांचा थेट सामना केला आहे. तसेच गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला देखील अटक करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये संजय शिंदे यांचा समावेश होता.

इन्स्पेक्टर संजय शिंदे यांच्या कारकिर्दीत अनेक वाद झाले आहेत. खुनाचा आरोप असलेला विजय पालांडे हा पोलीस चौकशी दरम्यान पोलीस कोठडीतून पळून गेला होता, त्यावेळी त्याला मदत करण्याचा आरोप देखील इन्स्पेक्टर संजय शिंदेंवर लावण्यात आला होता.

News Title : Who is the police officer who shot Akshay Shinde?

महत्वाच्या बातम्या –

“अक्षयचा एन्काऊंटर पैसे घेऊन केला, त्याच्या खिशात..”, वडिलांचा खळबळजनक आरोप

बिग बॉस मराठी 5 चा महाअंतिम सोहळा ‘या’ दिवशी पार पडणार!

“मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी अक्षयचा एन्काऊंटर”; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

एन्काऊंटरआधी अक्षयचे शेवटचे शब्द काय होते?, आईने केला मोठा खुलासा

“मृतदेह ताब्यात घेणार नाही..”; अक्षय शिंदेच्या आईचे पोलिसांवरच गंभीर आरोप

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now