माझे पैसे कधी देणार?, राखीचा प्रश्न ऐकून आदिल बारीक आवाजात म्हणतो…

On: February 9, 2023 5:54 PM
---Advertisement---

मुंबई | अभिनेत्री राखी सावंत(Rakhi Sawant) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत येत असते. सध्या ती तिच्या वैवाहिक जीवनात आलेल्या अडचणीमुळं चर्चेत आली आहे.

राखीनं पती आदिल खानवर(Adil Khan) एक्स्ट्रा मॅरीटल अफेअरचा आरोप केला आहे. या प्रकरणी तिनं पोसिल स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. यानंतर आदिलची चौकशी झाली आणि आदिलला अटक करण्यात आलं आहे.

राखीनं आदिलबाबत केलेल्या गौप्यस्फोटाबाबतचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यातच आता राखीचा आणि आदिलचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये असं दिसत आहे की, आदिल एका बेडवर बसला आहे आणि त्याच्या हातात औषधही दिसत आहेत. यावेळी राखी त्याला विचारात आहे की आदिल तू माझे पैसे कधी देणार आहे?, यावर आदिल बारीक आवाजात म्हणतो मी ४ महिन्यांत देईन पैसे तेही व्याजासह.

आदिलनं दिलेलं उत्तर ऐकून राखी म्हणते मला व्याज नकोय पण माझे पैसे दे. परत राखी रडत म्हणते की, मी तुला माझे दागिने विकून पैसे दिले आहेत. त्यामुळं तू माझे पैसे परत दे.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now