गरोदरपणासाठी योग्य वय कोणते?; महत्त्वाची माहिती समोर

On: October 27, 2025 3:06 PM
Right age for pregnancy
---Advertisement---

Right age for pregnancy | आजकालच्या धावपळीच्या जीवनात करिअरला प्राधान्य देताना अनेक तरुणींचे लग्न उशिरा होते. लग्नानंतर कुटुंब नियोजनाचा विचार करताना, ‘आई होण्यासाठी योग्य वय कोणतं?’ हा प्रश्न अनेकींच्या मनात असतो. मात्र व्हिडिओमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ यांनी यावर महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. (Right age for pregnancy)

काय आहे आदर्श वय? :

व्हिडिओमध्ये एका २७ वर्षीय तरुणीने लग्नानंतर बाळ होण्यासाठी किती काळ थांबावे, असा प्रश्न विचारला असता, स्त्रीरोगतज्ज्ञ यांनी सांगितले की, जर तिची प्रकृती उत्तम असेल (कोणतीही हार्मोनल समस्या, PCOD नसेल, ओव्हुलेशन आणि अंड्यांची गुणवत्ता चांगली असेल) तर ती लग्नानंतर एक वर्ष थांबू शकते. मात्र, त्यानंतर बाळ होण्याचा विचार करणे योग्य राहील.

स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्या मते, गरोदरपणासाठी आदर्श वय २५ वर्षांच्या आत आहे. परंतु, आजकाल मुली करिअरमध्ये व्यस्त असल्याने लग्न उशिरा करतात. अशा परिस्थितीत त्यांनी पहिले बाळ २७ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आणि दुसरे बाळ ३० वर्षांपूर्वी होईल, याचे नियोजन करावे. ज्यांचे लग्नच उशिरा होते, त्यांनी वयाच्या ३० वर्षांपर्यंत पहिले बाळ होईल, यासाठी प्रयत्न करावा, असा सल्ला त्यांनी दिला. बाळाचे नियोजन सुरू करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

Right age for pregnancy | लहान बाळांना मध देणे सुरक्षित आहे का? :

जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि इतर आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एक वर्षाखालील बाळांना कोणत्याही स्वरूपात मध देऊ नये. कच्चा मध, पाण्यात मिसळलेला मध किंवा घरगुती उपायांमध्ये वापरलेला मध बाळासाठी धोकादायक ठरू शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे मधामध्ये क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम (Clostridium botulinum) नावाचे जीवाणू असू शकतात, जे बाळांमध्ये ‘इन्फंट बोटुलिझम’ (Infant Botulism) नावाचा गंभीर आजार निर्माण करू शकतात. बाळाची पचनसंस्था एक वर्षापर्यंत पूर्ण विकसित झालेली नसल्याने, ती या जीवाणूंचा सामना करू शकत नाही. (Right age for pregnancy)

बाळ एक वर्षाचे झाल्यावर त्याची पचनसंस्था अधिक मजबूत होते आणि तेव्हा मध देणे तुलनेने सुरक्षित असते. मात्र, तरीही ते मर्यादित प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्यावे. बाळाच्या घशातील खवखव कमी करण्यासाठी किंवा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आईचे दूध, सूप किंवा फळांचा रस यांसारखे सुरक्षित पर्याय उपलब्ध आहेत.

News title : What is the right age for pregnancy?; Important information in front of you

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now