Weather Update | भारतीय हवामानशास्त्र विभागाने (India Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशाच्या विविध भागांतील वातावरणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. उत्तर भारतातील थंड वाऱ्यांचा जोर काहीसा ओसरल्याने महाराष्ट्रात (Maharashtra) थंडीचा प्रभाव कमी-जास्त होत असतानाच, दक्षिण आणि उत्तर भागातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून धुक्याचा इशाराही दिला आहे.
राज्यातील थंडीचे चढउतार आणि वाढते प्रदूषण
महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात (Weather Update) बदल जाणवत आहेत. धुळे (Dhule) येथे तापमानाचा पारा ६.२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला असून परभणी (Parbhani) ७.२ आणि अहिल्यानगर (Ahilyanagar) ९ अंशांच्या खाली नोंदवले गेले. जेऊर (Jeur) मध्ये नीचांकी थंडीची नोंद झाली, तर नाशिक (Nashik), मालेगाव (Malegaon), गोंदिया (Gondia), भंडारा (Bhandara) आणि यवतमाळ (Yavatmal) येथे तापमान १० अंशांच्या आसपास स्थिरावले आहे. पुणे (Pune) शहरात थंडीचा कडाका कायम असून पुढील दोन दिवस पारा १० अंशांच्या खालीच राहण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, मुंबई (Mumbai) मध्ये हवा प्रदुषणाची स्थिती बिकट झाली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाकडून १५१८ किमी रस्त्यांवर पाणी शिंपडण्यासाठी १०६ टँकरचा वापर करण्यात येत असून २ महिन्यांत ६७.८३ टन धूळ जमा करण्यात आली आहे. मुंबईत १९५४ बांधकाम प्रकल्प (Construction Sites) सुरू असून १०२० ठिकाणी सेन्सर (Sensors) बसवण्यात आले आहेत. हवेतील खराब गुणवत्तेमुळे सर्दी आणि तापाचे रुग्ण वाढत असून डॉक्टर मास्क वापरण्याचा सल्ला देत आहेत.
Weather Update | दक्षिण भारतात पावसाचे सावट:
भारतीय हवामान विभागाने (Weather Update) १६ डिसेंबर रोजी तामिळनाडू (Tamil Nadu), जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि पुद्दुचेरी (Puducherry) या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. दिल्ली (Delhi) मध्ये वाढत्या प्रदूषणासोबतच दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत. तसेच बिहार (Bihar) मधील पाटणा (Patna), भागलपूर (Bhagalpur) आणि दरभंगा (Darbhanga) या जिल्ह्यांसाठी दाट धुक्याचा इशारा (Fog Alert) प्रसिद्ध करण्यात आला आहे.
कोकण (Konkan), विदर्भ (Vidarbha) आणि पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra) या विभागांत हवामान स्थिर राहणार असले, तरी विदर्भात थंडीचा प्रभाव सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे. मुंबई आणि घाट माथ्यावर सकाळी आणि रात्री गारवा असेल, मात्र दिवसा तापमानात वाढ जाणवेल. धुक्यामुळे दृश्यमानता कमी होण्याची शक्यता असून उंच भागातील प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






