राज्यात अवकाळी पावसाचं थैमान, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

On: March 27, 2026 9:40 AM
IMD Monsoon Forecast
---Advertisement---

Weather Update | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील (Maharashtra) आणि विशेषतः मराठवाडा (Marathwada) भागातील वातावरणात विलक्षण बदल पाहायला मिळत आहेत. एका बाजूला कडाक्याचे ऊन, तर दुसरीकडे अवकाळी पावसाची संततधार अशी दुहेरी परिस्थिती निर्माण झाली आहे. मार्च महिना संपत आला तरी पावसाचा जोर कायम असल्याने रब्बी हंगामातील पिकांची मोठी नासाडी झाली आहे. सध्या प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू असली, तरी भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) आणखी पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याचा अंदाज

हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, आज राज्याच्या वातावरणात बरेच बदल अनुभवायला मिळतील. नांदेड (Nanded), लातूर (Latur), धाराशिव (Dharashiv), परभणी (Parbhani), सोलापूर (Solapur) आणि सांगली (Sangli) या सहा जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह जोरदार वृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, येत्या सोमवारपासून या पावसाचा जोर अधिकच वाढण्याची चिन्हे आहेत. याउलट, कोकण (Konkan) पट्ट्यात मात्र आज उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला असून, दुपारी बारा ते चार या वेळेत तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, सलग पाच दिवस उघडीप दिल्यानंतर चांदवड (Chandwad) आणि लगतच्या ग्रामीण भागाला पुन्हा एकदा अवकाळीने झोडपले आहे. ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह तब्बल एक तास झालेल्या या पावसामुळे बळीराजा पुरता कोलमडून गेला आहे. ऐन काढणीला आलेला गहू, हरभरा आणि सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवलेला कांदा या अस्मानी संकटामुळे पूर्णपणे भिजून खराब झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

हवामानातील या सततच्या चढउतारामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असून, शेती कामांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

Join WhatsApp Group

Join Now