Weather Update | काही दिवस विश्रांती घेतलेला पाऊस राज्यात पुन्हा एकदा हजेरी लावणार आहे. हवामान विभागाने शनिवारपासून मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे आणि रायगडसह मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. (Weather Update)
आजपासून पुढील काही दिवस मुसळधार पाऊस बरसेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. येत्या 48 तासांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज 19 सप्टेंबररोजी मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पाऊस पुन्हा सक्रिय होणार
त्यामुळे जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शनिवारी विदर्भ, मराठवाडा, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भाला मागील काही दिवसात पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होईल. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी बरसण्याची अपेक्षा आहे. याचबरोबर मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 24 तासांसाठी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.(Weather Update)
आजपासून पुढील काही दिवस पावसाचे
कोकणमध्ये देखील पावसाची शक्यता आहे. 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान राज्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 2 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अलर्ट राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Weather Update)
News Title- Weather Update Maharashtra News 19 September
महत्वाच्या बातम्या-
बँकेची काम आजच उरकून घ्या, सलग 4 दिवस बँका बंद राहणार
जोरदार उसळीनंतर सोनं पुन्हा झालं स्वस्त; सध्या काय आहेत किंमती?
ऑक्टोबर महिन्यात शनी नक्षत्र बदलणार, ‘या’ 3 राशींचं नशीब चमकणार
आनंदवार्ता! पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, जाणून घ्या 1 लिटरचे लेटेस्ट दर
तिरुपतीच्या प्रसादामध्ये तुपाऐवजी जनावरांची चरबी?, चंद्राबाबूंचा धक्कादायक आरोप






