राज्यातील ‘या’ भागात पाऊस कोसळण्याचा अंदाज, महत्त्वाची अपडेट समोर

On: June 3, 2024 5:21 PM
Weather Update
---Advertisement---

Weather Update | महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात यंदा पावसाची हजेरी असणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील काही भागांमध्ये 100 टक्के पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने (Weather Update) वर्तवला आहे. यंदा मान्सून एक दिवस लवकर दाखल झाला. मान्सून हा याआधी 31 मे रोजी केरळमध्ये दाखल व्हायचा. मात्र यंदा मान्सून हा 30 मे रोजी दाखल झाला. लोकसभा निवडणुकीप्रमाणे अनेकांचं लक्ष हे मान्सूनकडे लागलं आहे. कारण यंदाच्या वर्षी उष्णतेनं कहर केला आहे. यामुळे अनेक लोकं ही मान्सूनची वाट पाहत आहेत. (Weather Update)

उष्मघाताने मृत्यू

उष्मघाताने दररोज वेगवेगळ्या भागात मान्सूनने मृत्यू होताना दिसत आहे. तापमानाचा पारा हा काही ठिकाणी 50 अंश सेल्सिअस पार आहे. यामुळे आता मान्सून हा आपल्याभागात कधी पोहोचणार याची चर्चा आहे. एक दिलासा देणारी बाब म्हणजे केरळमध्ये मान्सून हा वेळेवर पोहोचला आहे. उर्वरित देशातही तो वेळेवर पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर तो गोव्यातून कोकणात येतो. त्यानंतर मुंबई येथे मान्सून दाखल होतो. त्यानंतर मान्सून संपूर्ण राज्यात दाखल होतो. केरळमध्ये एकदा का मान्सून दाखल झाल्यास तो राज्यात दहा दिवसानंतर दाखल होताना दिसतो. तर 10 किंवा 11 जूनला मान्सून मुंबईमध्ये दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

‘या’ भागात 100 टक्के पाऊस कोसळण्याचा अंदाज

या दरम्यान हवामान विभागाने मान्सूनच्या पावसाबद्दल काही महत्त्वाचे अंदाज वर्तवले आहेत. कोकण, नाशिक, चंद्रपूरमध्ये 100 टक्के पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने (Weather Update) वर्तवला आहे. त्याचवेळी राज्याच्या काही उर्वरित भागात 95 ते 98 टक्के पाऊस येण्याची शक्यता आहेत.

तर पुण्यातही 100 टक्के पावसाचे प्रमाण आहे. जून-जुलै महिन्यात पावसात खंड पडेल. पण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडणार असल्याच्या हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यातील अद्यापही काही भागात दुष्काळी स्थिती आहे. धरण, नदी तसेच तलाव आटले आहेत.

यामुळे आता पाणी टंचाई पाहायला मिळत आहे. मुबलक पाऊस व्हावा, यामुळे पिक व्यवस्थित येईल. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. सध्या उष्णतेनं अंगाची लाहीलाही होतेय. मुंबईसह राज्य उष्णतेनं हैराण झालं आहे. राज्यात मान्सून दाखल झाल्यास उकाड्यापासून लवकरच सुटका होईल. (Weather Update)

News Title – Weather Update About 100 Percent Rain In Konkan

महत्त्वाच्या बातम्या-

“अपघाताच्या रात्री दारु..”; अल्पवयीन मुलाची धक्कादायक कबुली

लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच सर्वसामान्यांना मोठा झटका!

खरचं रविना टंडनने मद्यधुंद अवस्थेत वृद्धेला मारहाण केली? यासंदर्भात रवीना काय म्हणाली

उष्णतेपासून दिलासा मिळणार! हवामान विभागाकडून महत्वाची अपडेट

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

Join WhatsApp Group

Join Now