Weather Forecast | भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department – IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील चार ते पाच दिवस देशभरात मान्सून सक्रिय राहणार असून, मध्य भारतात याचा जोर अधिक असेल. आग्नेय मध्य प्रदेशात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या काळात अनेक राज्यांमध्ये ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची आणि वादळाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
मध्य आणि पूर्व भारतात मुसळधार पावसाची शक्यता-
हवामान विभागाच्या (Weather Forecast) अंदाजानुसार, मध्य आणि पूर्व भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशात १० ते १५ जुलैपर्यंत, विदर्भात १० आणि ११ जुलैला, तर छत्तीसगडमध्ये ११ जुलै आणि १४-१५ जुलै रोजी जोरदार पाऊस अपेक्षित आहे. यासोबतच, झारखंडमध्ये १० जुलैला आणि ओडिशामध्ये १३ ते १५ जुलै दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम भारतासाठीही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण (Konkan) आणि गोव्यात (Goa) १० ते १५ जुलै दरम्यान मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याच कालावधीत गुजरातच्या (Gujarat) अनेक भागांमध्येही जोरदार पाऊस होईल. मध्य महाराष्ट्राच्या (Madhya Maharashtra) घाटमाथ्यावर १० जुलै रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
१५ जुलैपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस-
उत्तर-पश्चिम भारतातही पावसाचा (Weather Forecast) जोर कायम राहील. उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) १५ जुलैपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस अपेक्षित आहे, तर हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) १० जुलै आणि १३ ते १५ जुलै दरम्यान अतिवृष्टीची शक्यता आहे. पश्चिम उत्तर प्रदेश आणि पश्चिम राजस्थानमध्येही (Rajasthan) येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
ईशान्य भारतातील राज्यांमध्ये पुढील सात दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील. आसाम (Assam), मेघालय (Meghalaya), नागालँड (Nagaland), मणिपूर (Manipur), मिझोराम (Mizoram) आणि त्रिपुरामध्ये (Tripura) १० ते १५ जुलै दरम्यान जोरदार पाऊस होईल, तर अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh) ११ ते १५ जुलै दरम्यान अतिवृष्टीची शक्यता आहे.






