कंगनाच्या कानाखाली लगावणाऱ्या CISF महिलेला थेट बॉलिवूडकडून ऑफर

Kangana Ranaut | अभिनेत्री कंगना रनौत आता खासदार बनली आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशमधील मंडीच्या जनतेने निवडून दिले आहे. कंगनाने येथे कॉँग्रेसचे विक्रमादित्य सिंह यांचा पराभव केला आहे.कंगना मंडी लोकसभा मतदारसंघात 74 हजार 755 मतांनी विजयी झाली आहे.

विजयानंतर कंगना चंदीगड येथे गेली होती. मात्र, विमानतळावर तिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला. ज्याचे काही व्हिडीओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. या प्रकरणानंतर कंगना रनौत हिच्याकडून तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.

CISF च्या महिला जवानने लगावली कंगनाच्या कानशिलात

अभिनेत्री तथा नवीनच खासदार बनलेल्या कंगनाला (Kangana Ranaut) चंदीगड विमानतळावर CISF च्या कर्मचारी महिलेने थेट कानशिलात लगावली होती. या महिलेचे नाव कुलविंदर कौर असं असून तिला ताब्यात घेऊन निलंबित देखील करण्यात आलंय.

कंगनासोबत घडलेल्या या प्रकारानंतर बॉलीवुडमधील कोणत्याच कलाकारांनी भाष्य केलं नाहीये. अशातच प्रसिद्ध गायक आणि म्युझिक डायरेक्टर विशाल ददलानीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे आता एकच चर्चा रंगल्या आहेत. विशाल ददलानीने थेट त्या सीआयएसएफ महिलेचे कौतुक करत तिला मोठी ऑफर दिल्याची आता चर्चा होऊ लागली आहे.

विशाल ददलानीची पोस्ट चर्चेत

विशाल ददलानीने एक व्हिडीओ शेअर करत लिहिले की,”मी कधीही हिंसेचे समर्थन करत नाही पण सीआयएसएफ जवान महिलेचा राग मी पूर्णपणे समजू शकतो. त्या महिलेवर कारवाई झाली तर मी तिला नोकरी देईन, जर तिला ते मान्य असेल तर. जय हिंद, जय जवान आणि जय किसान.”, विशालच्या या पोस्टनंतर आता प्रचंड प्रतिक्रिया उमटत आहेत.

विशाल ददलानी कंगना रनौत (Kangana Ranaut)हिला कानाखाली लगावणाऱ्या सीआयएसएफ जवान महिलेला नोकरी देणार असल्याचं आता नेटकरी म्हणत आहेत. त्यातच त्याने या महिलेचं कौतुक केल्याने सोशल मीडियावर सध्या विशालचीच चर्चा होऊ लागली आहे.

Vishal Dadlani

News Title – Vishal Dadlani Supports Cisf Employee Who Slapped Kangana Ranaut

महत्त्वाच्या बातम्या-

“राम मंदिर तर बांधलं पण, शहरवासीयांचं जीवन..”; BJP च्या अयोध्येतील पराभवानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट

पुढील 48 तासांत ‘या’ भागांना अवकाळी झोडपणार; हायअलर्ट जारी

‘मोदींनी गेले तीन महिने आराम केला नाही, त्यामुळेच…’; चंद्राबाबूंचं मोठं वक्तव्य

नितीश कुमारांनी धरले नरेंद्र मोदींचे पाय, पाहा व्हिडीओ

चंद्राबाबू यांच्या पत्नीची संपत्ती 579 कोटींनी वाढली; पाच दिवसांत नेमकं असं काय घडलं?