Virender Sehwag controversy l भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग पुन्हा एकदा वादात सापडला आहे. IPL 2025 दरम्यान स्टार स्पोर्ट्सवरील एका शोमध्ये जाट समाजाबाबत केलेल्या विधानामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. “सगळ्यांची बुद्धी गुडघ्यात असते” असं विधान करून सेहवागने अनेकांच्या भावना दुखावल्याचं स्पष्ट झालं आहे.
सेहवाग सध्या IPL सामन्यांमध्ये समालोचक म्हणून सक्रिय असून त्याने ‘जाट समाज’ संदर्भात म्हटलं, “उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा – प्रत्येक ठिकाणचा जाट वेगळं बोलतो पण सर्वांची बुद्धी गुडघ्यात असते. दिमाग से सारे पैदल आहेत.” हे विधान करताना तो हसत होता, पण प्रेक्षकांनी ते फारच गंभीरपणे घेतलं आहे.
जाट समाजाची प्रतिक्रिया; रणदीप हुड्डाकडे माफीची मागणी :
सेहवागच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर युजर्सनी तीव्र रोष व्यक्त केला आहे. अनेकांनी त्याला माफी मागण्यास सांगितलं असून, काहींनी थेट अभिनेता रणदीप हुड्डा याच्याकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. “@RandeepHooda माफी मंगवाओ अब,” असे ट्विट्स व्हायरल होत आहेत.
विशेष म्हणजे सेहवाग स्वतःही जाट समाजातूनच येतो, त्यामुळे त्याचं हे विधान अनेकांना अजूनच अपमानास्पद वाटलं. टीकाकारांचं म्हणणं आहे की, सेहवागचा विनोद करण्याचा प्रयत्न समाजाच्या प्रतिष्ठेवर घाव घालणारा ठरतो.
Virender Sehwag controversy l सेहवागचं क्रिकेट करिअर आणि कॉमेंट्रीतील अस्तित्व :
सेहवागने भारतासाठी 350 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्याने एकूण 17,000 हून अधिक धावा केल्या आहेत. IPL मध्येही दिल्ली आणि पंजाबकडून त्याने 104 सामने खेळून 2 शतके व 16 अर्धशतके झळकावली आहेत.
On air Virendra Sehwag said,
“Uttar Pradesh ke jat ki bhasha alag hain, Rajasthan ke jaat ki bhasha alag, Haryana ke jaat ki bhasha alag hain… lekin dimag se sare paidal hain.”???????????? pic.twitter.com/4USVudfsVV
— Nitish Bharadwaj (@HarUniversity) April 8, 2025
क्रिकेटमधून निवृत्तीनंतर सेहवागने समालोचनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. त्याच्या बिनधास्त आणि विनोदी शैलीसाठी तो प्रसिद्ध आहे, मात्र यावेळी त्याची शब्दांची निवड त्याच्यावर उलटली असल्याचं दिसतंय.








