Virender Sehwag | टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आधीच त्याच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना, आता त्याचा लहान भाऊ विनोद सेहवागला चंदीगड पोलिसांनी अटक केली आहे.
कोर्टाने विनोद सेहवागला फरार घोषित केलं होतं. 7 कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात तो न्यायालयात हजर झाला नव्हता, त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली. चंदीगडच्या मनीमाजरा पोलीस ठाण्याने त्याला अटक करून कोर्टात हजर केलं. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असून, त्याच्या वकिलांनी जामीन अर्ज दाखल केला आहे.
सेहवागच्या कुटुंबावर संकट
विनोद सेहवाग हा वीरेंद्र सेहवागचा लहान भाऊ असून, त्याला याआधीही आर्थिक वादांमध्ये अडकलेले पाहायला मिळाले आहे. वीरेंद्र सेहवागला चार भाऊ-बहिणी आहेत, त्यापैकी दोन बहिणी मोठ्या आहेत. आता छोट्या भावाच्या अटकेमुळे सेहवागच्या कुटुंबावर आणखी संकट कोसळले आहे.
सेहवागची क्रिकेट कारकीर्द
वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात आक्रमक फलंदाजांपैकी एक मानला जातो. त्याने 1999 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि सलग 14 वर्षे भारतीय संघासाठी योगदान दिले.
- टेस्ट क्रिकेट: 104 सामने, 8,586 धावा
- वनडे क्रिकेट: 251 सामने, 8,273 धावा
- T20 आंतरराष्ट्रीय: 19 सामने, 394 धावा
सेहवागच्या आक्रमक शैलीमुळे प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर नेहमीच दबाव राहायचा. त्याने अनेक ऐतिहासिक खेळी केल्या आणि भारतीय क्रिकेटला मोठे यश मिळवून दिले.
Title : Virender Sehwag Brother Arrested in 7 Crore Cheque Bounce Case






