“हा माझा विजय तितकाच तुझाही विजय”, विराटची अनुष्कासाठी भावुक पोस्ट

Virat Kohli | टी 20 विश्वचषक पार पडला आहे. अखेर टीम इंडियाने द.आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवत भारतीयांचं स्वप्न पूर्ण केलं. भारताचं सध्या जगभर कौतुक होताना दिसत आहे. या विश्वचषकात टीम इंडियाने केवळ विश्वचषक मिळवला नाहीतर अनेकांची मनं जिंकूली आहेत. यामध्ये त्यांच्या कंटुंबाचा देखील तितकाच खारीचा वाटा आहे असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही.

विश्वचषकाला नात्याचं स्वरूप

देशासाठी आपला खेळ दाखवत असताना खेळाडू आपला संसार कुटुंब अशी दुहेरी भूमिका पार पडतात. या विश्वचषक विजयानंतर टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंचे कुटुंब मैदानात आले. यामुळे या विश्वचषकाला एक नात्याचं स्वरूप प्राप्त झालं. टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी तसेच त्यांचा मुलगा अंगद एकाच फ्रेममध्ये दिसले. तसेच कर्णधार रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितीका सोबत आनंद साजरा केला. यावेळी त्याने आपली मुलगी समैराला डोक्यावर घेऊन आनंद व्यक्त केलं. याचपार्श्वभूमीर आता विराट कोहलीने (Virat Kohli) देखील आपली पत्नी अनुष्का शर्मासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.

टीम इंडियाने विश्वचषकात विजय मिळवल्यानंतर अभिनेत्री आणि विराट कोहलीची (Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्माने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली होती आणि टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावर आता विराट कोहलीने (Virat Kohli) देखील सोशल मीडियावर पोस्ट करत अनुष्कासाठी प्रेमाचा वर्षाव केला आहे.

“हा माझा विजय तितकाच तुझाही विजय”

विराटने पोस्ट करत म्हटलं आहे की, “तुझ्याशिवाय हे शक्य झालं नसतं. तू मला नेहमी नम्र राहण्यास आणि जमीनीसोबत राहण्यास प्रयत्न करत असतेस आणि नेहमी सत्य सांगण्याचा प्रयत्न करतेस आणि नेहमी खरं काही सांगायचा प्रयत्न करत असते. हा माझा विजय आहे तितकाच तुझाही विजय आहे. तु जशी आहेस त्यासाठी मी तुझ्यावर प्रेम करतो”, असं विराट कोहलीने (Virat Kohli) पोस्टच्या माध्यमातून आपल्या पत्नीप्रती भावना व्यक्त केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

दरम्यान विराट कोहलीच्या या पोस्टवर अनेकांनी हार्ट इमोजीस पाठवल्या आहेत. विराट आणि अनुष्काचा विवाह हा 11 डिसेंबर 2017 मध्ये झाला. 2021 मध्ये अनुष्काने बाळाला जन्म दिला. तिचं नाव हे वामिका ठेवण्यात आलं. 2024 मध्ये फेब्रुवारी महिन्यात तिने आणखी एका मुलाला जन्म दिला. मात्र अद्यापही दोन्ही बाळांचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले नाहीत.

News Title – Virat Kohli Emotional Post On Anushka Sharma News Update

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींचं हिंदुंबाबत धक्कादायक वक्तव्य; पंतप्रधान मोदींनी सुनावले खडेबोल

शत्रुघ्न सिन्हांची तब्येत बिघडली, प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती समोर!

लग्न केलं एकासोबत आणि रहायचंय बॉयफ्रेंडसोबत, विवाहीत महिलेची अजबच मागणी

“तुला बायको ना मुलगी, ना संसार,भटका माणूस..”; संभाजी भिडेंचा कुणी घेतला समाचार?

तृणमूल नेत्याची भर रस्त्यात महिलेला अमानुषपणे मारहाण; व्हिडिओ व्हायरल