तृणमूल नेत्याची भर रस्त्यात महिलेला अमानुषपणे मारहाण; व्हिडिओ व्हायरल

On: July 1, 2024 1:43 PM
Trinamool MLA Video viral of Beat Young Man And Woman
---Advertisement---

Trinamool MLA Video | पश्चिम बंगालमध्ये चोपडा परिसरात एका तरुण-तरुणीला भर रस्त्यात अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या प्रकरणी भाजपचे नेता अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली असून त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये टीएमसी नेता तरुण-तरुणीला भर रस्त्यात प्रचंड मारहाण करत असल्याचं दिसून येतंय. या प्रकरणात टीएमसी नेत्याकडून मारहाण करण्यात येणाऱ्या तरुण आणि तरुणीवर विवाहबाह्य संबंधांचा आरोप आहे. काही मीडिया रिपोर्टने याबाबत म्हटलंय की, मारहाण करणाऱ्या टीएमसी नेत्याला संबंधित परिसरात जेसीबी म्हणून ओळखलं जातं. त्याचं खरं नाव तजेमुल असून तो आमदार हमीदूर रहमान यांचा निकटवर्तीय मानला जातो.

या व्यक्तीविरोधात अनेक गुन्हे देखील दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. याच टीएमसी नेते जेसीबीवर एका तरुण-तरुणीला भर रस्त्यावर मारहाण करण्याचे आरोप आता करण्यात येत आहेत. मारहाण (Trinamool MLA Video) होताना नागरिक नुसतंच बघत राहिले. कुणीही पुढे येऊन या नेत्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.

व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय?

संबंधित व्हायरल व्हिडीओत टीएमसी नेता छडीने तरुणीला अतिशय अमानवीयपणे मारहाण करताना दिसून येत आहे. त्यानंतर तो तरुणालाही मारहाण करतो. यानंतर तो पुन्हा तरुणीचे केस पकडतो (Trinamool MLA Video) आणि तिला मारहाण करताना दिसून येत आहे.

या मारहाण करणाऱ्या नेत्याची गावात प्रचंड दहशत असल्याचं म्हटलं जातंय. त्याच्या भीती पोटी व्हिडिओ काढणारा व्यक्ती हा गाव सोडून गेल्याचं काही मीडिया रिपोर्टने म्हटलंय. नेता मारहाण करताना आधी कुणीही तरुण-तरुणीला वाचवण्यासाठी पुढे येताना दिसत नाहीत. नंतर काहीजण तिथे येतात. हा व्हिडिओ एका व्यक्तीने लपून शूट केला आहे. आता तो घाबरून गाव सोडून गेलाय.

भाजपकडून पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार टीका

बऱ्याच जणांना याचे व्हिडिओ (Trinamool MLA Video) पोस्ट केले होते. मात्र, नंतर दबाव आणल्याचं कारण देत अनेकांनी व्हिडिओ डिलिट केले आहेत. या घटनेनंतर भाजप नेते अमित मालवीय यांनी संबंधित व्हिडीओ ट्विट करत पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार टीका केली आहे.  “व्हिडीओत जो व्यक्ती महिलेला मारहाण करतोय त्याचं नाव तजेमुल (परिसरात जेसीबी नावाने प्रसिद्ध) आहे. तो त्याच्या सो कॉल्ड न्याय सभेच्या माध्यमातून त्वरित न्याय देण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच तो चोपडाचे आमदार हमीदूर रहमान यांच्या जवळच आहे”, असं अमित मालवीय यांनी म्हटलंय.

तसंच “टीएमसी पक्षाद्वारे चालवल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमधील शरिया न्यायालयाच्या वास्तवाची भारताला जाणीव व्हायला हवी. इथे प्रत्येक गावात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या महिलांसाठी शाप आहेत. बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा मागमूसही नाही. ममता बॅनर्जी या राक्षसावर कारवाई करतील की शेख शहाजहानप्रमाणे त्याचा बचाव करतील?”, असा सवाल देखील अमित मालवीय यांनी केला आहे.

News Title – Trinamool MLA Video viral of Beat Young Man And Woman

महत्वाच्या बातम्या-

सूर्याच्या कॅचवरून आफ्रिकन चाहत्यांचे सवाल; माजी दिग्गज खेळडूने दिलं जोरदार प्रत्युत्तर

महिन्याच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी; LPG सिलिंडर ‘इतक्या’ रुपयांनी झाले स्वस्त

‘वर्ल्ड कप विजयाच्या नावाखाली….’; जितेंद्र आव्हाडांच्या आरोपांनी खळबळ

महादेवाच्या कृपेने ‘या’ 5 राशींवर होणार धनवर्षाव!

भर कॉन्सर्टमध्ये गायिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार; प्रायव्हेट पार्टबाबत..

Join WhatsApp Group

Join Now