संजीव गोएंका यांचा पारा चढला! ऋषभ पंतला भर मैदानात झापलं, फोटो व्हायरल

On: April 2, 2025 1:05 PM
Rishabh Pant
---Advertisement---

Rishabh Pant l आयपीएल 2025 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा पंजाब किंग्जकडून झालेला पराभव केवळ खेळापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्याचा परिणाम थेट संघमालक आणि खेळाडूंच्या संवादावर झाला. सोशल मीडियावर सध्या एक फोटो प्रचंड चर्चेत आहे, ज्यामध्ये संजीव गोएंका हे कर्णधार ऋषभ पंतकडे बोट दाखवत काहीतरी बोलत आहेत. कपाळावर आठ्या, चेहरा त्रस्त आणि देहबोलीत असलेला असंतोष हा फोटो अधिक बोलका बनवतोय.

पंजाबकडून लखनऊचा दणदणीत पराभव :

1 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने लखनऊ सुपर जायंट्सचा 8 विकेट्सनी सहज पराभव केला. लखनऊने प्रथम फलंदाजी करत 171 धावा केल्या, मात्र पंजाबने अवघ्या 17 षटकांत 2 विकेट्स गमावत लक्ष्य पूर्ण केलं. हा लखनऊचा तिसऱ्या सामन्यातील दुसरा पराभव ठरला. यामुळे संघावर आणि विशेषतः कर्णधार ऋषभ पंतवर टीकेची झोड उठली आहे.

एलएसजीने ऋषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी रुपये खर्च केले होते, आणि तो IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. मात्र, आतापर्यंतच्या 3 सामन्यांमध्ये त्याचं प्रदर्शन अत्यंत निराशाजनक राहिलं आहे. त्याने केवळ 17 धावा केल्या असून, त्याच्या कामगिरीवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

याच पार्श्वभूमीवर संजीव गोएंका यांनी मैदानातच ऋषभ पंतकडे बोट दाखवून संवाद साधल्याचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. या फोटोने IPL चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि चर्चेला सुरुवात केली आहे.

Rishabh Pant l नेटकऱ्यांना आठवला के.एल. राहुल :

हा फोटो पाहून अनेक नेटकऱ्यांनी गेल्या हंगामातील के.एल. राहुलची आठवण काढली. IPL 2024 मध्ये संजीव गोएंकांनी पराभवानंतर राहुलला सार्वजनिकरित्या फटकारलं होतं. त्यामुळे यंदा पंतवरही तसाच प्रसंग ओढावतोय का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.

लखनऊचा पुढील सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी संघाला एकत्रित प्रयत्न करावे लागतील. विशेषतः ऋषभ पंतसाठी हा सामना ‘करो या मरो’सारखा ठरण्याची शक्यता आहे. कारण जर पुन्हा अपयश आलं, तर त्याच्या कर्णधारपदावरही गदा येऊ शकते.

News Title: IPL 2025: Viral Photo Shows Sanjiv Goenka Pointing at Rishabh Pant After LSG Loss

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now