विनोद तावडेंनी 5 कोटी वाटले, माझ्याकडे डायरी..; विरारमध्ये बविआ-भाजपमध्ये मोठा राडा

On: November 19, 2024 1:26 PM
Vinod Tawde
---Advertisement---

Vidhan Sabha Elections 2024 | विधानसभेसाठी एक दिवस शिल्लक असताना राज्यात नाट्यमय घडामोडी घडताना दिसून येत आहे. सध्या विरारमध्ये चांगलाच राजकीय ड्रामा पाहायला मिळत आहे. येथे पैसे वाटल्याच्या आरोपांवरून भाजप आणि बविआमध्ये तूफान राडा झाला आहे. भाजपचे नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटले, असा आरोप बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. (Vidhan Sabha Elections 2024 )

विनोद तावडे (Vinod Tawde) हे विरारमधील एका हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते. ही गोष्ट बविआच्या (BVA) कार्यकर्त्यांना समजली तेव्हा त्यांनी हॉटेलवर धाव घेतली. यानंतर हॉटेलमध्ये बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे दिसून आले. बविआ कार्यकर्त्यांनी तावडे यांना घरल्याचेही यावेळी दिसून आले.

विनोद तावडे यांच्यावर गंभीर आरोप

विनोद तावडे हे मंगळवारी विरार पूर्वेला असणाऱ्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्यात बैठक सुरु होती, असा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. या बैठकीबाबत संपूर्ण माहिती असलेली डायरी देखील आपल्याकडे असल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केलाय. (Vidhan Sabha Elections 2024 )

माझ्याकडे डायरी असून त्यात कुणाला पैसे वाटण्यात आले, त्याची माहिती आहे. वसई पश्चिम 5 अशा प्रकारे कोणत्या भागात किती पैसे पोहोचवायचे असं त्यात लिहिलं आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी पैसे देताना पकडले असल्याचंही हितेंद्र ठाकूर म्हणाले आहेत. तसेच, पैसे वाटताना तावडे यांनी विणवण्या केल्या, ते हॉटेलमध्ये दुसऱ्या माळ्यावर कुठेतरी बसले असल्याचं हितेंद्र ठाकूर म्हणाले आहेत. तावडे यांना कारवाईशिवाय सोडणार नाही, असा इशारा देखील हितेंद्र ठाकूर यांनी दिलाय.

News Title –  Vidhan Sabha Elections 2024 Vinod Tawde  caught distributing money in virar 

महत्त्वाच्या बातम्या-

एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला सर्वात मोठा झटका!

चंद्रकांत पाटील यांचा कमिन्सच्या कर्मचाऱ्यांशी संवादाने प्रचाराचा समारोप

कालीचरण महाराजांच्या वक्तव्यामुळे संजय शिरसाटांचं टेन्शन वाढलं?

बारामतीमध्ये खळबळ; श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये धडकले पोलीस, नेमकं काय घडलं?

ग्राहकांना झटका! निवडणुकीपूर्वीच सोनं महागलं, भावात एकदमच झाली ‘इतकी’ वाढ

Join WhatsApp Group

Join Now