2024 साठी नरेंद्र मोदींचा मोठा प्लॅन?; अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

On: December 23, 2022 2:13 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) सर्वात मोठ्या मास्टरस्ट्रोकची माहिती समोर आली आहे. तमिळनाडूतील रामनाथपुरम लोकसभा मतदार संघातून मोदी निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वडोदरा आणि उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून निवडणूक लढवली होती. मात्र 2024 मोदी तमिळनाडूमधून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जातंय.

उत्तर भारतात नितीश कुमार, सुखबीर बादल आणि इतर लहान पक्षांमुळे जे नुकसान झालंय, ते दक्षिण भारतातून भरून काढण्याचा भाजपचा विचार आहे.

दरम्यान, रामनाथपुरम जिल्हा तामिळनाडूच्या ३38जिल्ह्यांपैकी एक आहे. हा परिसर माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे जन्मस्थान आहे.

रामेश्वरम, तामिळनाडूतील सर्वात महत्त्वाचे देवस्थान आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक, याच जिल्ह्यात आहे. याशिवाय रामसेतूचीही सुरुवात येथून होते, ज्याद्वारे रामाने लंका जिंकली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now