‘या’ ३ वस्तू देतात गरिबीला निमंत्रण! घरात सुख-समृद्धी हवी असेल तर चुकूनही ठेवू नका, पाहा सविस्तर

On: March 31, 2026 6:57 PM
Vastu Tips
---Advertisement---

Vastu Tips | वास्तूशास्त्रानुसार घरातील वातावरण, ऊर्जा आणि वस्तूंची मांडणी याचा थेट परिणाम घरातील सुख-समृद्धीवर होत असल्याचं मानलं जातं. घरात सकारात्मक ऊर्जा राहिली तर कुटुंबातील सदस्यांच्या आयुष्यात प्रगती, आनंद आणि शांतता टिकून राहते. मात्र काही वस्तू नकळत घरात ठेवलेल्या असतात आणि त्या नकारात्मक ऊर्जा वाढवण्याचं कारण ठरू शकतात.

तज्ज्ञांच्या मते, जर घरात सतत वाद, आर्थिक अडचणी किंवा मानसिक ताण वाढत असेल तर घरातील काही वस्तू त्यासाठी कारणीभूत असू शकतात. वास्तूशास्त्रात अशा काही वस्तूंचा उल्लेख केला आहे, ज्या घरात ठेवल्यास वास्तूदोष निर्माण होतो आणि दारिद्र्य वाढू शकतं. त्यामुळे या वस्तू त्वरित घरातून काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो.

गंज लागलेल्या वस्तू घरात ठेवू नका :

वास्तूशास्त्रानुसार घरात गंज लागलेल्या वस्तू ठेवणं अशुभ मानलं जातं. गंजलेलं लोखंड, दरवाज्यांचे भाग, टाळे-चावी किंवा इतर धातूच्या वस्तूंवर गंज चढला असेल तर त्या घरात ठेवू नयेत. अशा वस्तूंमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरातील शांतता कमी होण्याची शक्यता असते.

तसेच गंज लागलेल्या वस्तू दीर्घकाळ घरात ठेवल्यास आर्थिक अडचणी वाढू शकतात, असंही मानलं जातं. त्यामुळे घरात अशा वस्तू असतील तर त्यांची दुरुस्ती करून वापरा किंवा त्या लगेच घराबाहेर काढून टाका.

Vastu Tips | बंद पडलेलं घड्याळ ठेवणं मानलं जातं अशुभ :

वास्तूशास्त्रानुसार घरात बंद पडलेलं घड्याळ ठेवणं अत्यंत अशुभ मानलं जातं. बंद घड्याळ म्हणजे थांबलेली वेळ अशी त्याची प्रतिमा तयार होते आणि त्यामुळे घरातील प्रगतीवर परिणाम होऊ शकतो, असं मानलं जातं.

यामुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद वाढू शकतात आणि आर्थिक प्रगतीतही अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे घरातील बंद पडलेली घड्याळं त्वरित दुरुस्त करा किंवा ती काढून टाका. काही ठिकाणी घड्याळ गिफ्ट देणं देखील टाळावं, असंही सांगितलं जातं.

घरात कचरा आणि धूळ साचू देऊ नका :

घरात विनाकारण कचरा साचलेला असेल किंवा गच्ची, छपरावर जुनी पत्र्याची किंवा वापरात नसलेली वस्तू ठेवलेली असेल तर त्याचाही वास्तूवर नकारात्मक परिणाम होतो. अशा वस्तूंमुळे घरातील ऊर्जा असंतुलित होते, असं मानलं जातं.

त्यामुळे घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वच्छ घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि समृद्धीचे मार्ग खुलतात, अशी वास्तूशास्त्रातील धारणा आहे. त्यामुळे घरातील नको असलेल्या वस्तू वेळोवेळी काढून टाकणं गरजेचं आहे.

News Title: Vastu Tips: Remove These 3 Things From Home to Avoid Money Problems and Vastu Dosha

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now