Sun Transit | ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशी परिवर्तन सर्व 12 राशींवर वेगवेगळा प्रभाव टाकत असते. विशेषतः सूर्याचा गोचर महत्त्वाचा मानला जातो. 15 जून रोजी सूर्याने मिथुन राशीत प्रवेश केला असून पुढील 30 दिवस तो याच राशीत भ्रमण करणार आहे. या बदलाचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आर्थिक स्थिती, करिअर, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो.
मेष आणि सिंह राशींसाठी अनुकूल काळ :
मेष राशीच्या व्यक्तींमध्ये या कालावधीत आत्मविश्वास आणि धैर्य वाढू शकते. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळू शकते. महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये सहभाग वाढण्याची शक्यता असून करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. आर्थिक बाबतीतही स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊ शकते. मात्र, अपेक्षित यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. तसेच प्रवासातून लाभ होण्याची शक्यता असून भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होऊ शकतात.
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे मिथुन राशीतील संक्रमण लाभदायक मानले जात आहे. बराच काळ प्रलंबित असलेल्या कामांना गती मिळू शकते. उत्पन्न वाढण्याची शक्यता असल्याने आर्थिक अडचणी कमी होऊ शकतात. प्रेमसंबंध असलेल्या व्यक्तींसाठी नातेसंबंध पुढच्या टप्प्यावर जाण्याची शक्यता असून काहींसाठी विवाहयोगही जुळून येऊ शकतो. मित्रांचे सहकार्य मिळेल आणि करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. मात्र, रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.
Sun Transit | तूळ राशीला भाग्याची साथ :
तूळ राशीच्या व्यक्तींना पुढील काही आठवड्यांत नशिबाची विशेष साथ मिळू शकते. दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात आणि त्याचा योग्य फायदा घेता येऊ शकतो. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यांमध्ये सहभाग वाढण्याची शक्यता आहे.
तसेच या कालावधीत काही किरकोळ आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक ठरेल. तसेच संवाद साधताना संयम बाळगणे आणि रागावर नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याच्या या गोचराचा सकारात्मक प्रभाव पुढील 28 दिवस या राशींवर कायम राहू शकतो.






