“ताई, फक्त न्याय द्या”, सुप्रिया सुळेंसमोर व्यथा मांडताना वैष्णवीच्या वडिलांचे अश्रू अनावर

On: May 22, 2025 4:24 PM
Vaishanvi Hagawane
---Advertisement---

Vaishnavi Hagwane  | वैष्णवी हगवणे प्रकरणात आता पर्यंत तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या आरोपींना तुरुंगात रंगीला पंजाब हॉटेलमधून खास जेवण मिळत असल्याचा गंभीर आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे. त्यांनी हा प्रकार खासदार सुप्रिया सुळेंपुढे (Supriya Sule) मांडून न्यायासाठी मदत मागितली आहे.

सुप्रिया सुळेंचा पाठिंबा

सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी व्हिडिओ कॉलद्वारे वैष्णवीच्या आई-वडिलांशी संवाद साधला आहे. त्यांनी सांगितलं की, “मी तुमच्या सोबत आहे, या प्रकरणात कठोरपणे लढा देऊ.” यावेळी भावनिक होऊन वैष्णवीच्या आई-वडिलांच्या अश्रू वाहू लागले. सुप्रियां सुळे यांनी आरोपींना तुरुंगात विशेष सुविधा दिल्या जात असल्याची माहिती घेऊन त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

वैष्णवीच्या वडिलांनी सुप्रियांकडे हात जोडून आपली व्यथा मांडली आहे. “ताई, आमच्या मुलीला न्याय द्या.” यावेळी त्यांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले होते. यावर सुप्रिया सुळेंनी त्यांना भेटण्याचं आश्वासन दिलं असून, पुण्यात (Pune) लवकरच येणार असल्याचं सांगितलं.  त्यांनी अटक केलेल्या आरोपींना तुरुंगात रंगीला पंजाब हॉटेलमधून जेवण दिलं जात असल्याचा ठोस आरोप केला आहे, ज्याची दखल घेण्याची विनंती केली आहे.

लग्नात ५१ तोळे सोनं, गाडी अन् चांदीची भांडी

वैष्णवीच्या मूत्यू प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र हगवणे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र हगवणे यांच्यासह कुटुंबातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. मात्र ते सध्या पोलीसांच्या ताब्यात नाहीत, फरार आहेत. वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं की, सासरच्या वादविवादांमुळे मुलीला मानसिक आणि शारीरिक त्रास झाला, त्यामुळेच तिने जीवन संपवलं.

एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, राजेंद्र हगवणे यांनी वैष्णवीच्या कुटुंबाकडून लग्नासाठी ५१ तोळे सोनं, फॉर्च्युनर कार आणि चांदीची भांडी घेतली. मात्र लग्नानंतर सासरच्या त्रासामुळे वैष्णवीची परिस्थिती बिकट झाली. सासू आणि नणंद यांनी तिला सतत त्रास दिला, तिच्या चारित्र्यावरही प्रश्न उपस्थित केले.

Title : “Tai, just give justice”, Vaishnavi’s father bursts into tears as he expresses his grief to Supriya Sule

Join WhatsApp Group

Join Now