Induction Cooktop Safety | सध्या अनेक घरांमध्ये गॅसऐवजी इंडक्शन स्टोव्हचा वापर वाढताना दिसत आहे. कमी खर्च, सुरक्षितता आणि जलद स्वयंपाक यामुळे इंडक्शन लोकप्रिय होत आहे. मात्र इंडक्शनचा योग्य पद्धतीने वापर केला नाही तर तो लवकर खराब होऊ शकतो आणि स्वयंपाक करताना अचानक बंदही पडू शकतो. त्यामुळे इंडक्शन वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. (Induction Cooktop Safety)
विशेषतः नवीन इंडक्शन वापरणाऱ्यांनी काही सामान्य चुका टाळणे गरजेचे आहे. योग्य पद्धतीने वापर केल्यास इंडक्शन स्टोव्ह बराच काळ टिकतो आणि त्याची कार्यक्षमता देखील चांगली राहते. चुकीच्या वापरामुळे मात्र त्यातील भाग खराब होऊ शकतात.
स्वयंपाकानंतर लगेच बंद करू नका :
बऱ्याच जणांची सवय असते की स्वयंपाक संपताच इंडक्शन लगेच बंद करतात. मात्र ही चूक ठरू शकते. स्वयंपाक करताना इंडक्शन खूप गरम झालेले असते. त्यामुळे त्यातील आतील भाग थंड होण्यासाठी थोडा वेळ लागतो. (Kitchen Tips Marathi)
जर लगेच बंद केले तर उष्णता बाहेर पडू शकत नाही आणि यामुळे इंडक्शनच्या यंत्रणेला नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून स्वयंपाक झाल्यानंतर काही मिनिटे इंडक्शन चालू ठेवून त्याला थंड होण्याची संधी द्यावी.
Induction Cooktop Safety | प्लग लगेच काढू नका आणि स्वच्छता ठेवा :
स्वयंपाकानंतर इंडक्शनचा प्लग ताबडतोब काढू नये. कारण वापरानंतरही इंडक्शनमधील कूलिंग फॅन काही वेळ चालू राहतो. हा फॅन आतली उष्णता बाहेर काढण्याचे काम करतो. जर लगेच प्लग काढला तर कूलिंग प्रक्रिया अर्धवट राहते आणि त्यामुळे इंडक्शनचे आयुष्य कमी होऊ शकते. (Induction Cooktop Safety)
याशिवाय इंडक्शनची नियमित स्वच्छता करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. इंडक्शनच्या बाजूला किंवा तळाशी असलेल्या वेंटिलेशनच्या जागांमध्ये धूळ साचली तर गरम हवा बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे इंडक्शन जास्त गरम होऊ शकतो. त्यामुळे या जागा वेळोवेळी स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. तसेच इंडक्शन नेहमी मोकळ्या आणि हवेशीर जागेत ठेवावे, जेणेकरून त्याची कूलिंग सिस्टीम व्यवस्थित काम करू शकेल.






