उर्मिला मातोंडकरचा संसार मोडणार, लग्नाच्या 8 वर्षांनी घेणार घटस्फोट?

On: September 25, 2024 8:44 AM
Urmila Matondkar files for divorce
---Advertisement---

Urmila Matondkar | बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) लग्नाच्या 8 वर्षांनी पतीपासून घटस्फोट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. उर्मिला हिचं वैवाहिक आयुष्य आता कायद्याच्या कचाट्यात अडकलंय. अभिनेत्रीने मुंबई न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. यामुळे उर्मिलाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

उर्मिला तिचा पती मोहसिन अख्तर मीर याला घटस्फोट देणार असल्याची माहिती समोर आली आहे. उर्मिलाने 2016 मध्ये व्यावसायिक मोहसिन मीरसोबत लग्न केले. काही मीडिया रिपोर्टनुसार उर्मिला आता मोहसिनपासून विभक्त होणार असून तिने घटस्फोटासाठी याचिका देखील दाखल केली आहे.

लग्नाच्या 8 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय

लग्नाच्या 8 वर्षांनंतर उर्मिला पतीपासून विभक्त होणार आहे. इतकंच नाही तर, उर्मिला मातोंडकरचा हा घटस्फोट परस्पर संमतीने होत नसल्याची देखील जोरदार चर्चा आहे. पाहायला गेलं तर, उर्मिलाने याबाबत अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. दोघांच्या घटस्फोटामागील कारण अद्याप समोर आलं नाहीये. (Urmila Matondkar)

उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर मीर यांनी 4 फेब्रुवारी 2016 रोजी लग्न केलं. तेव्हा त्यांच्या लग्नाच्या खूप चर्चा झाल्या. दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्याने त्यांचं लग्न तेव्हा फार चर्चेत होतं. याशिवाय दोघांच्या वयात 10 वर्षांचा फरक होता. उर्मिला ही पती मोहसिनपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. मात्र, दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. उर्मिला लवकरच पतीपासून घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जातंय.

दोघांच्या वयात 10 वर्षांचा फरक

या वृत्तामुळे उर्मिलाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर सध्या याची जोरदार चर्चा आहे. सध्या फक्त आणि फक्त उर्मिला हीच्याबद्दल बोललं जातंय. चाहते घटस्फोट घेण्यामागे काय कारण असावे, याबाबत वेगवेगळे अंदाज बांधत आहेत. (Urmila Matondkar)

News Title :  Urmila Matondkar files for divorce

महत्वाच्या बातम्या –

अक्षय शिंदेच्या मृत्यूचं खरं कारण समोर, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

आज ग्रहमान कोणत्या राशीला साथ देतील?, वाचा मेष ते मीनचे राशीभविष्य

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर अजित पवारांचं मोठं भाष्य!

गोळ्या घालून नाही तर… तुडवून मारायला पाहिजे होतं; उदयनराजेंची बेधडक प्रतिक्रिया

अक्षय शिंदेच्या एन्काउंटर मागची कथा खरी की खोटी?

Join WhatsApp Group

Join Now