ऐकावं ते नवलंच! चक्क सासूने दिला जावयाच्या मुलाला जन्म, सर्वत्र एकच चर्चा

On: March 17, 2025 12:45 PM
Unique Pregnancy Woman Became Surrogate Mother
---Advertisement---

Unique Pregnancy | अनोख्या त्यागाची ही कथा सध्या संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. अमेरिकेतील क्रिस्टी श्मिट (Christy Schmidt) यांनी आपल्या जावयाच्या बाळाला जन्म देऊन एक अद्वितीय उदाहरण घडवले आहे. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी सरोगसीच्या माध्यमातून आपल्या मुलीच्या अपत्याला जन्म देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने संपूर्ण कुटुंब भावूक झालं असून आनंदाच्या क्षणांनी घर गजबजून गेलं आहे. (Unique Pregnancy )

मुलीच्या स्वप्नासाठी आईचा मोठा त्याग

ही कहाणी आहे एका आईच्या अपार प्रेमाची आणि त्यागाची. क्रिस्टी श्मिट यांची मुलगी हेईडी आणि तिचा पती जॉन यांना दीर्घ काळानंतरही मूल होत नव्हतं. त्यांनी अनेक प्रयत्न केले, विविध वैद्यकीय उपचार घेतले, पण त्यांना यश लाभले नाही. शेवटी, क्रिस्टी यांनी आपल्या मुलीच्या आनंदासाठी स्वतः सरोगेट मदर होण्याचा निर्णय घेतला.

हा निर्णय घेणे सोपे नव्हते, परंतु क्रिस्टी यांनी स्वतः वैद्यकीय तपासणी करून घेतली आणि डॉक्टरांनीही त्यांना यासाठी ग्रीन सिग्नल दिला. त्यानंतर, डॉक्टरांनी IVF च्या माध्यमातून भ्रूण प्रत्यारोपण केले. 9 महिन्यांनंतर क्रिस्टी यांनी आपल्या मुलीच्या आणि जावयाच्या बाळाला जन्म दिला, आणि अखेर त्यांच्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण झाले.

वयाच्या 52 वर्षी दिला मुलाला जन्म 

हेईडी आणि जॉन यांचे 2015 साली लग्न झाले होते. मात्र, अनेक वर्षे प्रयत्न करूनही तिला मूल होत नव्हते. 2020 साली तिला पहिल्यांदा गरोदर राहण्याचा अनुभव मिळाला, पण दुर्दैवाने तिच्या गर्भात वाढणाऱ्या जुळ्या बाळांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तिला सांगितले की तिला गर्भाशयाशी संबंधित दुर्मिळ समस्या आहे आणि ती पुन्हा गरोदर राहिल्यास तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. (Unique Pregnancy )

हेईडीचे दु:ख तिची आई क्रिस्टी यांना पाहवेना. म्हणूनच त्यांनी आपल्या मुलीसाठी मोठा निर्णय घेतला आणि सरोगसीद्वारे तिच्या जावयाच्या मुलाला जन्म दिला. त्यांनी आपल्या मुलीला वचन दिले की 9 महिन्यांनंतर ती हे बाळ तिला सुपूर्द करेल, आणि तिने तसेच केले. वयाच्या 52 व्या वर्षी क्रिस्टी पुन्हा आई बनली आणि एकाच वेळी आजीही झाली. या प्रसंगाची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

Title : Unique Pregnancy Woman Became Surrogate Mother for Her Daughter

 

Join WhatsApp Group

Join Now