मोठी बातमी! तारकर्ली समुद्रात पुण्यातील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू

On: February 22, 2025 3:52 PM
Tarkarli Beach
---Advertisement---

Tarkarli Beach l मालवणमधील (Malvan) तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर (Tarkarli Beach) शनिवारी (दि. 22) दुर्दैवी घटना घडली. पुण्याहून (Pune) आलेले पाच पर्यटक समुद्रात आंघोळीसाठी उतरले होते. त्यापैकी तीन जण खोल समुद्रात गेल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला, तर एकाला वाचवण्यात यश आले.

स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष :

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास पुण्यातील (Pune) काही पर्यटक तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर (Tarkarli Beach) आंघोळीसाठी आले होते. पाचपैकी तीन पर्यटक खोल समुद्रात गेले. स्थानिकांनी त्यांना खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला होता, मात्र तरीही ते खोल समुद्रात गेले.

Tarkarli Beach l दोघांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर :

पाण्यात बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केले. तिघांपैकी एकाला वाचवण्यात त्यांना यश आले, मात्र दोघांचा बुडून मृत्यू झाला. शुभम सुशील सोनवणे (हडपसर, पुणे) (Hadapsar, Pune) आणि रोहित बाळासाहेब कोळी (हडपसर, पुणे) (Hadapsar, Pune) अशी मृतांची नावे आहेत.

ओंकार रामचंद्र भोसले (पुणे) (Pune) याची प्रकृती गंभीर असून, त्याला उपचारासाठी सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रशासनावर नाराजी :

तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर (Tarkarli Beach) अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

News title : Two Pune Tourists Drown at Tarkarli Beach; One Rescued

Join WhatsApp Group

Join Now