Vibhu Raghav Passes Away | लोकप्रिय टीव्ही मालिका ‘निशा और उसके कजिन्स’मधून घराघरात पोहोचलेले अभिनेता विभू राघव (Vibhu Raghav Passes Away) याचं सोमवारी दु:खद निधन झालं. गेल्या काही वर्षांपासून तो स्टेज 4 कोलन कॅन्सरशी झुंज देत होता. विभूचं मूळ नाव वैभव कुमार सिंह राघव होतं. वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास मुंबईतील नानावटी रुग्णालयात घेतला.
कलाकारांचा मदतीचा हात :
विभू राघवने ‘सावधान इंडिया’सारख्या इतर मालिकांमधूनही प्रेक्षकांची मने जिंकली होती. 2022 मध्ये त्याला कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर तो नियमितपणे सोशल मीडियावरून आपल्या आरोग्यविषयक अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत होता. त्याच्या शेवटच्या पोस्टमधूनही त्याची सकारात्मकता आणि जीवनावरील प्रेम दिसून येत होतं, त्यामुळे अनेक चाहते भावूक झाले आहेत.
विभूवर शेवटच्या काळात नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारांचा खर्च वाढल्याने अभिनेत्री सिंपल कौल, अदिती मलिक आणि इतरांनी सोशल मीडियावरून आर्थिक मदतीचं आवाहन केलं होतं. 27 मे रोजी सिंपलने लिहिलेल्या भावनिक पोस्टमध्ये म्हटलं होतं, “आमचा मित्र विभू आमच्यासाठी केवळ सहकारी नाही तर कुटुंबासारखाच आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून तो स्टेज 4 कॅन्सरशी झुंज देतोय. आता पुढील उपचारासाठी तातडीने निधी आवश्यक आहे.” (Vibhu Raghav Passes Away)
Vibhu Raghav Passes Away | टीव्ही विश्वावर शोककळा :
विभूच्या निधनाची बातमी समजताच टीव्ही क्षेत्रात शोककळा पसरली. ‘बिग बॉस 18’चा विजेता आणि अभिनेता करणवीर मेहराने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत शोक व्यक्त केला. (Vibhu Raghav Passes Away)
विभूचा लढा आणि त्याची सकारात्मकता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली होती. मात्र नियतीच्या विरोधात लढा अपुरा पडला आणि अखेर हा गुणी कलाकार सर्वांना सोडून गेला.








