Vibhu Raghav Passes Away | टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेता विभू राघव (Vibhu Raghav Passes Away) यांचे कॅन्सरने निधन झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून ते आतड्याच्या कॅन्सरशी (Colon Cancer) संघर्ष करत होते. अखेर त्यांची ही झुंज संपली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. विभूच्या कॅन्सरने चौथ्या स्टेजपर्यंत (Stage 4) मजल मारली होती. सोशल मीडियावरून ते आपल्या चाहत्यांना कॅन्सर आणि त्यांच्या आरोग्याविषयीचे अपडेट्स सातत्याने देत होते. आता विभू राघव यांच्या निधनानंतर त्यांचा शेवटचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.
शेवटचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल :
विभू राघव (Vibhu Raghav Passes Away) यांनी एप्रिल महिन्यात आपल्या कॅन्सर उपचाराविषयी चाहत्यांना माहिती देण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले होते की, त्यांचा कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला होता. केमोथेरपीचाही काहीच फायदा होत नसल्याचे त्यांनी या व्हिडिओतून चाहत्यांना सांगितले होते. त्यांनी म्हटले होते, “कॅन्सर उपचाराबाबत तुम्हाला अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. डिसेंबरमध्ये स्कॅन केल्यानंतर आम्हाला समजले की कॅन्सर वाढला आहे. तो लिव्हरपासून फुफ्फुस आणि छातीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे जानेवारीमध्ये आम्ही नवीन केमोथेरपी सुरू केली होती.”
ते पुढे म्हणाले होते, “चार केमोनंतर आम्ही फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी पुन्हा स्कॅन केले, तेव्हा समजले की याचा काहीच उपयोग होत नाहीये आणि कॅन्सर वाढत आहे. त्यामुळे आता आम्ही नवीन ट्रीटमेंट सुरू केली आहे. आता ट्रीटमेंट संपल्यानंतर पुन्हा स्कॅन केल्यावर चांगली बातमी मिळेल, अशी अपेक्षा आहे. तुमचे प्रेम आणि प्रार्थना यांची गरज आहे.” विभूच्या निधनानंतर त्याचा हा व्हिडिओ पाहून आता चाहते अतिशय हळहळ व्यक्त करत आहेत.
Vibhu Raghav Passes Away | कलाकाराला गमावल्याचे दुःख :
२०२२ मध्ये विभू राघवला ‘कोलन कॅन्सर’ (आतड्याचा कॅन्सर) कॅन्सरचे निदान झाले होते. तेव्हापासून तो या आजारावर उपचार घेत होता. दुर्दैवाने, त्याचा कॅन्सर शेवटच्या टप्प्यावर पोहोचला होता. कॅन्सरवरील उपचारामुळे त्याच्याकडचे पैसेही संपले होते. त्याच्या उपचारासाठी आणि त्याला मदतीसाठी अनेक कलाकार पुढे आले होते, ज्यामुळे त्याला काही प्रमाणात आर्थिक आधार मिळाला होता.
‘निशा और उसके कझन्स’ (Nisha Aur Uske Cousins) आणि ‘सुरवीन गुग्गल’ (Surveen Guggal) यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये त्याने काम केले होते, जिथे त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. त्याच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली असून, एका उमद्या कलाकाराला गमावल्याचे दुःख व्यक्त होत आहे. (Vibhu Raghav Passes Away)








