उन्हाळ्यात चेहरा फ्रेश ठेवायचाय, तर ‘हे’ उपाय तातडीने करा!

On: March 31, 2025 3:59 PM
Winter Skincare
---Advertisement---

Oily Skin Care l उन्हाळा सुरू होताच त्वचेच्या समस्याही वाढू लागतात, विशेषतः ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांना पिंपल्स, खाज, आणि पुरळ यांचा सामना करावा लागतो. अशा काळात त्वचेची योग्य काळजी घेणं अत्यंत गरजेचं ठरतं. अमरावतीच्या त्वचारोग तज्ज्ञ यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलकट त्वचेसाठी काही खास उपाय आणि काळजी घेण्याच्या पद्धती अवलंबल्या तर चेहरा फ्रेश आणि स्वच्छ राहू शकतो.

उष्णता आणि उकाडा यामुळे त्वचेवर अधिक तेल तयार होतं आणि त्यातून छिद्रं बंद होऊन पिंपल्स निर्माण होतात. याशिवाय, सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कामुळे त्वचा लालसर होण्याचाही धोका असतो. त्यामुळे उन्हाळ्यातील तापमानाच्या तडाख्यापासून त्वचेला सुरक्षित ठेवण्यासाठी खास काळजी घ्या.

त्वचेचा प्रकार ओळखा आणि योग्य प्रॉडक्ट निवडा :

प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कुठलंही उत्पादन वापरण्याआधी त्वचेचा प्रकार ओळखणं महत्त्वाचं आहे. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी ऑइल-फ्री आणि ग्लिसरीन-फ्री प्रॉडक्ट्स वापरणे योग्य ठरतं. उन्हाळ्यातही अशा त्वचेला मॉइश्चरायझरची गरज असते, पण ते योग्य प्रकारचं असणं आवश्यक आहे.

याशिवाय, ग्लायकोलिक अ‍ॅसिड किंवा सॅलिसिलिक अ‍ॅसिड असणारे फेसवॉश तेलकट त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. हे फेसवॉश चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल दूर करून त्वचेचे छिद्र मोकळे ठेवतात आणि पिंपल्सचा धोका कमी करतात.

Oily Skin Care l सनस्क्रीनचा वापर विसरू नका! :

उन्हाळ्यात सूर्यप्रकाशाचा परिणाम त्वचेवर अधिक तीव्र असतो. त्यामुळे योग्य सनस्क्रीनचा वापर गरजेचा आहे. त्वचेच्या प्रकारानुसार SPF 30 किंवा त्याहून अधिक असणारे सनस्क्रीन निवडा आणि दर 3 तासांनी ते पुन्हा लावा. बाजारात मिळणाऱ्या महागड्या सनस्क्रीनपेक्षा तुमच्या त्वचेला सूट होणारा ब्रँड महत्त्वाचा आहे.

त्याचबरोबर, चेहरा दिवसातून 3-4 वेळा थंड पाण्याने धुणं त्वचेसाठी लाभदायक ठरतं. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि ऑईल सिक्रेशन नियंत्रणात राहतं.

घरगुती उपाय टाळा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या :

अनेकदा लोक त्वचेसाठी घरगुती उपाय करतात, मात्र त्वचेचा प्रकार माहीत नसेल तर हे उपाय फायदेशीर ठरण्याऐवजी हानीकारक ठरू शकतात. त्यामुळे कोणताही उपचार सुरू करण्याआधी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असं आवाहन यांनी केलं आहे.

जर त्वचेवर खाज, पुरळ किंवा सूज जाणवत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. वेळेवर उपचार न घेतल्यास ही लक्षणं तीव्र स्वरूप धारण करू शकतात.

News Title: Oily Skin in Summer? Try These Dermatologist-Recommended Tips to Keep Your Face Fresh

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now