शपथविधी विजयचा, पण चर्चा मात्र त्रिशाचीच; अभिनेत्रीच्या लूकवरुन चाहत्यांची नजर हटेना

On: May 10, 2026 10:37 AM
Trisha Krishnan
---Advertisement---

Trisha Krishnan | तामिळनाडूच्या राजकारणात आज एका नवीन पर्वाची सुरुवात होत असून, ‘तमिळगा वेत्री कझगम’ (TVK) या पक्षाचे प्रमुख सी. जोसेफ विजय (C. Joseph Vijay) यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा चेन्नई (Chennai) येथे दिमाखात पार पडत आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा कृष्णन (Trisha Krishnan) आज सकाळी जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर (Jawaharlal Nehru Stadium) दाखल झाली. थलपती विजय यांचा शपथविधी मात्र चर्चा त्रिशाच्याच लूकची.

त्रिशाचा आकर्षक लूक आणि उपस्थिती

या सोहळ्यासाठी त्रिशाने सोनेरी नक्षीकाम केलेली निळ्या रंगाची रेशमी साडी (Blue Silk Saree) परिधान केली असून, मोगऱ्याचा गजरा आणि साजेसा शृंगार असा तिचा पारंपारिक लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. चेन्नईतील आपल्या निवासस्थानावरून निघताना त्रिशाने या ऐतिहासिक सोहळ्याबद्दल कमालीची उत्सुकता व्यक्त केली. तिच्यासोबत तिची आई उमा कृष्णन (Uma Krishnan) यादेखील उपस्थित आहेत.

विशेष म्हणजे, ४ मे (4 May) रोजी विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच त्रिशाचा वाढदिवस होता. त्या दिवशी तिने तिरुपती (Tirupati) मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते आणि त्यानंतर ती विजय यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचली होती. आजच्या सोहळ्यासाठी तिची उपस्थिती चित्रपट आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by थोडक्यात (@thodkyaat)

तामिळनाडूतील ऐतिहासिक सत्तापालट

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय यांच्या टीव्हीके (TVK) पक्षाने १०८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून झेप घेतली आहे. त्यांनी डीएमके (DMK) आणि एआयएडीएमके (AIADMK) यांसारख्या दिग्गज पक्षांना मागे सारत ऐतिहासिक यश मिळवले. शनिवारी संध्याकाळी विजय यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर (Rajendra Arlekar) यांची भेट घेऊन १२० आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सोपवल्यानंतर सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला.

आज सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या सोहळ्याला विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत. व्हीसीके (VCK) आणि आयएमयूएल (IUML) या पक्षांच्या पाठिंब्यामुळे टीव्हीके आघाडीचे संख्याबळ बहुमताच्या पलीकडे गेले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींनंतर अखेर आज विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.

News Title: Trisha Krishnan attends Thalapathy Vijay swearing in ceremony

Join WhatsApp Group

Join Now