Asirgarh Fort | बुऱ्हाणपूर (Burhanpur) जवळील असिरगड किल्ल्यावर (Asirgarh Fort) अचानक हजारो लोकांची गर्दी उसळल्याचे दिसून आले. हातात फावडे, कुदळी आणि अगदी मेटल डिटेक्टर घेऊन नागरिक खोदकाम करताना दिसून आले. यामागील कारण म्हणजे, औरंगजेबाचा (Aurangzeb) लपलेला खजिना मिळू शकतो, अशी अफवा पसरली. या घटनेला ‘छावा’ (Chhava) चित्रपटाच्या कथानकाचा संदर्भ मिळाल्यामुळे अजूनच वेग आला.
असिरगड किल्ल्यावर हजारोंची गर्दी
बुऱ्हाणपूरजवळील असिरगड किल्ल्यावर गेल्या तीन दिवसांपासून नागरिक मोठ्या प्रमाणावर उत्खनन करत आहेत. हा भाग पूर्वी मुघल साम्राज्याची छावणी म्हणून ओळखला जात होता. ‘छावा’ चित्रपटात मराठ्यांनी बुऱ्हाणपूर लुटल्याचे दाखवण्यात आले आहे, याच पार्श्वभूमीवर लोकांना असा विश्वास वाटू लागला की, औरंगजेबाचा मौल्यवान खजिना याच परिसरात दडलेला आहे.
अफवेचा परिणाम: खोदकाम सुरू
18 किमी अंतरावर असलेल्या असिरगड किल्ल्याजवळ राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी बांधकाम कंपनीच्या खोदकामातून काही जुनी नाणी सापडल्याने चर्चांना अधिक चालना मिळाली. या नाण्यांचा संदर्भ घेत आणि चित्रपटातील कथानकाशी जोडत, नागरिकांनी स्वतःच उत्खनन सुरू केले. विशेष म्हणजे, यामध्ये केवळ स्थानिक नाही, तर आसपासच्या गावांतील नागरिकही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्याचे दिसूनआले.
मुघल इतिहास आणि असिरगडचा खजिना
बुऱ्हाणपूर हे मुघल साम्राज्याच्या दक्षिण मोहिमांसाठी महत्त्वाचे ठिकाण होते. येथे मोठ्या प्रमाणावर व्यापारी आणि सैन्याची रहदारी होती. स्थानिकांचा असा दावा आहे की, मोहिमा संपल्यानंतर सैनिकांनी आणि अधिकाऱ्यांनी आपले मौल्यवान धन येथेच पुरले असावे. याच दाव्यांमुळे नागरिकांनी किल्ला आणि महामार्ग परिसर खोदण्यास सुरुवात केली आहे. सध्या प्रशासनाने याची दखल घेत लोकांना थांबवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
Title : Treasure Hunt at Asirgarh Fort








