तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावर पुण्याचे तीन पर्यटक बुडाले; दोघांचा मृत्यू, एक थोडक्यात वाचला

On: February 26, 2025 4:26 PM
Tragedy at Tarkarli Beach Two Tourists Drown  One Rescued
---Advertisement---

Tarkarli Beach | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील प्रसिद्ध तारकर्ली समुद्र किनारा (Tarkarli Beach) पुन्हा एकदा दुर्दैवी दुर्घटनेचा साक्षीदार ठरला. पुण्यातून आलेल्या पाच पर्यटकांपैकी तीन जण खोल समुद्रात गेल्याने त्यातील दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे, तर एका पर्यटकाचा थोडक्यात बचाव करण्यात आला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य हाती घेतले, मात्र दोघांना वाचवण्यात अपयश आले.

सावधतेच्या सूचना दुर्लक्षित, जीव गमवावा लागला

शनिवार (दि. 22) रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास पुण्यातील काही पर्यटक तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर आंघोळीसाठी गेले होते. यापैकी तीन जण खोल समुद्रात गेल्याने त्यांच्यावर संकट कोसळले. स्थानिक नागरिकांनी त्यांना खोल समुद्रात जाऊ नका, असे स्पष्ट सांगितले होते. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष करून ते समुद्राच्या पुढील भागात गेले आणि पाण्याच्या लाटांमध्ये अडकले. काही क्षणांतच परिस्थिती बिघडली आणि तिघेही समुद्राच्या प्रवाहात वाहत गेले.

स्थानिकांचा शर्थीचा प्रयत्न, तरीही दोन जणांचे प्राण गेले

घटनेनंतर तातडीने स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. समुद्रात अडकलेल्या तिघांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यापैकी एका पर्यटकाला वाचवण्यात यश आले, मात्र दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

मृत्यू झालेल्या पर्यटकांची ओळख पटली आहे, शुभम सुशील सोनवणे (वय 24, हडपसर, पुणे), रोहित बाळासाहेब कोळी (वय 23, हडपसर, पुणे) यांचा मृत्यू झाला आहे.  तर, ओंकार रामचंद्र भोसले (वय 25, पुणे) याला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षावर स्थानिकांची नाराजी-

तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर यापूर्वीही अशा अनेक दुर्घटना घडल्या आहेत. प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था पुरेशी नसल्याने वारंवार जीवितहानी होत आहे, अशी स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. समुद्रात पोहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी योग्य ती सूचना फलक आणि सुरक्षा यंत्रणा उपलब्ध नसल्याने अशा घटना घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Tarkarli Beach )

Title : Tragedy at Tarkarli Beach Two Tourists Drown  One Rescued

 

Join WhatsApp Group

Join Now