Pimpri Traffic Diversion | डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी परिसरात दरवर्षी मोठ्या संख्येने नागरिक अभिवादनासाठी येतात. यंदाही आज म्हणजेच ६ डिसेंबर रोजी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) स्मारक परिसरात अपेक्षित गर्दीचा विचार करून वाहतूक विभागाने काही महत्वाच्या मार्गात बदल केले आहेत. दुपारी १२ ते रात्री १० या वेळेत हे बदल राहणार असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Pimpri Traffic Diversion)
पिंपरीतील वाहतूक बदलाची अंमलबजावणी :
महावीर चौक, नाशिक फाटा, पिंपरी चौक (Pimpri Chowk) आणि जवळील महत्त्वाच्या रस्त्यांवर गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी वाहतुकीचे मार्ग बदलले आहेत. चिंचवड येथील महावीर चौक ते पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकादरम्यान सेवारस्त्याने येणाऱ्या वाहनांना तात्पुरती बंदी लागू केली आहे. याकरिता चालकांनी डी-मार्ट इन-ग्रेड सेपरेटरमार्गे पुढील प्रवास करावा, असा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.
याप्रमाणे कासारवाडीतील नाशिक फाटा (nashik phata) चौकातून पिंपरीकडे जाणाऱ्या सेवारस्त्यावरील वाहनांसाठी देखील बदल करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहनांना डेअरी फार्म ग्रेड सेपरेटर किंवा खराळवाडी येथील एच. पी. पेट्रोल पंपाजवळून उपलब्ध असलेल्या ग्रेड सेपरेटरचा वापर करून पुढील स्थळी जाता येणार आहे. हे सर्व बदल गर्दी टाळण्यासाठी आणि स्मारक परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी करण्यात आले आहेत.
Pimpri Traffic Diversion | महत्त्वाच्या मार्गांवरील तात्पुरती प्रवेशबंदी :
पिंपरी रेल्वे स्थानकाजवळील स्व. इंदिरा गांधी पूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकादरम्यानचा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. या मार्गावरील वाहने मोरवाडी चौकातून पुढे जातील. याशिवाय नेहरूनगर चौकापासून पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंतचा मार्ग देखील बंद राहणार असून वाहनचालकांनी एच. ए. कॉर्नर बसथांबा ते मासूळकर कॉलनीमार्गे पुढे जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Pimpri Traffic Diversion)
देहूरोड (Dehuroad) आणि संपूर्ण पिंपरी (Pimpri) परिसरातील या सर्व मार्गबदलांबद्दल वाहतूक विभागाने नागरिकांना आगाऊ सतर्क केले आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणाऱ्या गर्दीमुळे कोणतीही कोंडी निर्माण होऊ नये म्हणून हे बदल तात्पुरते लागू करण्यात आले असून सर्व वाहनचालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






