पुणेकरांनो, घराबाहेर पडण्यापूर्वी हे वाचा! रमजाननिमित्त ‘या’ भागातील वाहतुकीत मोठे बदल

On: February 22, 2026 2:04 PM
Pune Traffic Change
---Advertisement---

Pune Traffic Change | पुणे शहरातील कोंढवा परिसरात पवित्र रमजान महिन्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठी गर्दी अपेक्षित आहे. इफ्तारच्या वेळी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सायंकाळी ५ ते रात्री १२ या वेळेत विशेष वाहतूक नियम लागू करण्यात आले असून रमजान संपेपर्यंत ही नियमावली कायम राहणार आहे. (Ramzan 2026 Pune)

शीतल पेट्रोल पंप चौक, कौसरबाग आणि पारगेनगर या भागात रोजा सोडण्यासाठी खाद्यपदार्थ, फळे आणि इतर वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते. अरुंद रस्ते आणि वाढलेली वाहनांची संख्या यामुळे वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून पोलिसांनी नियोजनबद्ध पावले उचलली आहेत. वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी स्थानिक स्वयंसेवकही तैनात राहणार आहेत. (Kondhwa traffic diversion)

जड वाहनांना प्रवेशबंदी :

कौसरबाग परिसरातील ज्योती हॉटेल चौक ते मेफेअर सोसायटी आणि पारगेनगर या दरम्यान सर्व प्रकारच्या जड वाहनांना, जसे टँकर आणि ट्रक, पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच सर्वोदय चौकातून कौसरबागेकडे जाणाऱ्या मार्गावरही जड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. या निर्णयामुळे इफ्तारच्या वेळी होणारी गर्दी आणि संभाव्य कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. (Pune Traffic Change)

वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे की नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे वाहनचालकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

Pune Traffic Change | हे आहेत पर्यायी मार्ग :

जड वाहनांसाठी मेफेअर सोसायटी चौक ते ज्योती हॉटेल चौक असा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. तर हलकी आणि इतर वाहने ज्योती हॉटेल चौक, शीतल पेट्रोल पंप चौक आणि पारगेनगर या मार्गांचा वापर करून प्रवास करू शकतात. या बदलांमुळे मुख्य रस्त्यावरील ताण कमी होऊन वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे. (Pune Traffic Change)

पुणे वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि गर्दीच्या वेळेत शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. नियमांचे पालन केल्यास सर्वांसाठी सुरक्षित आणि सुरळीत प्रवास शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.

News title : Traffic Changes in Kondhwa for Ramzan Pune

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now