पर्यटकांनो सिंहगडावर फिरायला जाण्यापूर्वी ‘ही’ बातमी नक्की वाचा!

On: April 18, 2026 3:14 PM
Pune News
---Advertisement---

Pune News | पुण्यातील (Pune) प्रसिद्ध पर्यटनस्थळ सिंहगड किल्ल्यावर (Sinhagad Fort) घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका पर्यटकाचा अचानक मृत्यू झाल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

ट्रेकदरम्यान घडली दुर्दैवी घटना :

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश रघुनाथ भोकरे (Suresh Raghunath Bhokare) हे 55 वर्षीय व्यक्ती आपल्या मित्रांसोबत सिंहगडावर ट्रेकिंगसाठी गेले होते. पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास ते आतकरवाडी (Atkawadi) येथे पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी गड चढण्यास सुरुवात केली. चढाईदरम्यान पढेर मेटा येथील मारुती मंदिराजवळ पोहोचल्यावर भोकरे यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली पडले.

घटनेनंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने मदत करत त्यांना स्ट्रेचरच्या सहाय्याने खाली आणले आणि जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

Pune News | प्रशासनाचे आवाहन आणि खबरदारी:

या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी बळीराम वायकर (Baliram Waikar), नितीन गोळे (Nitin Gole), उत्तम खामकर (Uttam Khamkar) आणि संदीप कोळी (Sandip Koli) यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने प्रशासनाने विशेष सूचना जारी केल्या आहेत.

सिंहगड वन परिमंडळ अधिकारी समाधान पाटील (Samadhan Patil) यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः वृद्ध व्यक्ती आणि आरोग्याच्या समस्या असलेल्या नागरिकांनी तीव्र उन्हात डोंगर चढणे टाळावे, असे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेनंतर पर्यटकांनी ट्रेकिंग करताना योग्य काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित झाले आहे.

News title : Tourist Dies at Sinhagad Fort Trek

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now