आज या राशीच्या व्यक्तींना धन प्राप्तीचे योग जुळून येतील

On: May 31, 2024 8:08 AM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope l मेष:- माहीत नसलेल्या कामात लक्ष घालू नका. ठरवलेले विचार अचानक बदलू नका. परदेश कंपनी कडून लाभाचे योग. उत्पन्नात वाढ होईल. शुभ अंक २ ,शुभ रंग लाल

वृषभ:- हातातील कामाला यश लाभेल. शेजार्‍यांची मदत घेता येईल. धन प्राप्तीचे योग जुळून येतील. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. शुभ अंक ९, शुभ रंग निळा

मिथुन:- नवीन कामात हात घालू शकता. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ शक्य. मुलांची एखादी कृती त्रस्त करू शकते. मनोबल वाढीस लागेल. शुभ अंक ६, शुभ रंग हिरवा

कर्क:- काटकसरीपणाचा फायदा होईल. दुसर्‍याच्या स्वभावातील दोष दर्शवू नका. आजचा दिवस लाभदायक. ज्येष्ठ व्यक्तींचे अमूल्य सहकार्य लाभेल. शुभ अंक ८, शुभ रंग नारंगी

सिंह:- इतरांना सल्ला देण्याचे काम उत्तम करू शकाल. नेहमीसारखी आनंदी वृत्ती जागृत ठेवा. तुमच्या ज्ञानाच्या अनुभवाचे कौतुक केले जाईल. तुमच्या बोलण्याचा समोरच्यावर प्रभाव पडू शकेल. शुभ अंक ७, शुभ रंग पिवळा

कन्या:- आजूबाजूचे धूर्त लोक ओळखून रहा. लपवाछपवीच्या गोष्टी करू नका. धन संचयात वाढ होण्याची शक्यता. बचतीच्या योजना आखाल. मागे हटू नका. शुभ अंक ५, शुभ रंग लाल

Today Horoscope l तूळ:- स्वत:च्या मतावर ठाम रहा. गोड बोलून कार्यभाग साधावा. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. कामात सुलभता जाणवेल. प्रलंबित योजना मार्गी लावाल. शुभ अंक ४, शुभ रंग काळा

वृश्चिक:- मोठे काम करताना सावधानता बाळगावी. तीव्र इच्छा जागृत ठेवावी. वस्तु खरेदी करताना चोखंदळ रहा. अन्यथा नुकसान संभवते. शुभ अंक ९, शुभ रंग हिरवा

धनू:- विद्यार्थ्यांना उत्तम काळ राहील. संमिश्र घटनांचा दिवस. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. क्षुल्लक गोष्टीने खट्टू होऊ नका. शुभ अंक १ ,शुभ रंग जांभळा

मकर:- नवीन कामात आळस करू नका. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. योग्य संधीची वाट पाहावी. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. कामाच्या स्वरुपात काहीसा बदल संभवतो. शुभ अंक ५, शुभ रंग पिवळा

Today Horoscope l कुंभ:- मनातील विचार बोलून दाखवा. चुकीच्या विचारणा प्रयत्नपूर्वक दूर सारा. आर्थिक गोष्टींकडे कटाक्षपणे लक्ष द्या. विवाह इच्छुक असलेल्यांना शुभ वार्ता मिळेल. नेतृत्व गुण वाढीस लावा. शुभ अंक २, शुभ रंग विटकरी

मीन:- इतरांचे प्रेम संपादन करा. उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या संपर्कात याल. मुलांना नवीन संधी लाभू शकते. शुभ अंक ८, शुभ रंग निळा

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

सौरव गांगुलीचा गौतम गंभीरला विरोध?; सौरव गांगुलीच्या पोस्टने खळबळ

अडचणीत सापडलेल्या आव्हाडांची छगन भुजबळांकडून पाठराखण, म्हणाले…

बाप, आज्यानंतर आता आईही अडचणीत; आईच्या रक्ताची चाचणी होणार

‘गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा’; अजित पवारांचं अंजली दमानियांना उत्तर

गौतमी पाटीलमुळे लावणी भ्रष्ट झाली, लावणीला डाग लागला- डॉ. चंदनशिवे

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now