आजचा दिवस ‘या’ राशींसाठी असणार अत्यंत शुभ; मिळणार पद, पैसा आणि प्रतिष्ठा

On: October 25, 2024 8:04 AM
Today Horoscope 25 October
---Advertisement---

Today Horoscope | आज 25 ऑक्टोबररोजी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाची नवमी तिथी आहे. नवमी तिथी रात्री 3 वाजून 23 मिनिटांपर्यंत चालेल. तर शनिवारी पहाटे 5 वाजून 26 मिनिटांपर्यंत शुभ योग जुळून येईल. त्याचबरोबर पुष्य नक्षत्र सकाळी 7 वाजून 40 मिनिटांपर्यंत जागृत असेल. आज राहू काळ 1 वाजून 30 मिनिटांपासून सुरु होईल ते 3 वाजेपर्यंत असेल. (Today Horoscope)

आजचे राशी भविष्य

कन्या रास : दिवसाची सुरुवात प्रफुल्लित होईल. स्थिर चित्ताने कामे सुरू करावीत. सुंदर वस्त्रे परिधान कराल. मनातील नकारात्मक विचार दूर होतील. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून फायदा होईल. कुटुंबात सामंजस्याचे वातावरण राहील.आज जवळचा प्रवास योग आहे.

तूळ रास : आज या राशीच्या व्यक्तींना राजकारणात मोठे पद मिळणार. त्यांची प्रतिष्ठा वाढणार. बौद्धिक कामात व्यग्र राहाल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. दूरचा प्रवास संभवतो. धार्मिक स्थळाला भेट द्याल. नोकरीच्या ठिकाणी देखील आनंदाची बातमी मिळेल.

वृश्चिक रास : दिवस समाधानात जाईल. स्वत:चे निर्णय स्वत: घ्या. राजकीय गोष्टींमध्ये फायदा मिळेल.आपली आवड जोपासाल. मनाजोगी कमाई करता येईल. आज वैचारिक बदल दिसून येईल. सहकारी मदत करतील. व्यापारात वाढ होईल. (Today Horoscope)

कुंभ रास : तुम्ही आज नवीन कामाची सुरुवात करू शकता.तुमच्या आरोग्याच्या तक्रारी देखील दूर होतील. समोरील संधी सोडू नका. स्वत:चा फायदा लक्षात घेऊन वागाल. (Today Horoscope)

News Title : Today Horoscope 25 October 

महत्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! शरद पवार गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

ठाकरेंनी बड्या नेत्याची उमेदवारी नाकारली!

धक्कादायक! 85 विमानं बॉम्बने उडवण्याची धमकी; काय आहे प्रकरण

आज ‘या’ दिग्गज नेत्यांनी भरले उमेदवारी अर्ज

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मोठी अपडेट्स समोर

Join WhatsApp Group

Join Now