आज शंभर टक्के या राशी गुलाल उधळणार; पाहा कोणाचं नशीब उजळणार

On: June 4, 2024 9:11 AM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope l मेष:- घरात उत्साहाचे वातावरण राहील. आवश्यक तेथेच बढाया मारा. भौतिक विकास होईल. एखादा नवीन करार होण्याची शक्यता. आरोग्यात सुधारणा होईल. शुभ अंक २, शुभ रंग पोपटी

वृषभ:- कौटुंबिक खर्च वाढेल. घरात मानाची वागणूक मिळेल. कामातील नवीन योजनांवर भर द्यावा. कुटुंबासमवेत वेळ चांगला जाईल. मनोकामना पूर्णत्वास जाण्याचे योग. शुभ अंक ४, शुभ रंग काळा

मिथुन:- आपले मानसिक आरोग्य स्वस्थ ठेवा. करमणुकीच्या साधनात जास्त वेळ घालवाल. घरातील ज्येष्ठ मंडळींशी चर्चा कराल. मानसिक शांतता व समाधान लाभेल. एखादे काम पूर्ण दिवस घेईल. शुभ अंक ६, शुभ रंग लाल

कर्क:- अतिधाडसाने कोणताही निर्णय घेऊ नका. आपल्या बोलण्यात स्पष्टता ठेवाल. सृजनात्मक कार्यातील आवड वाढेल. हातातील कामात यश येईल. सहकारी संपूर्ण सहकार्य करतील. शुभ अंक ८, शुभ रंग गुलाबी

सिंह:- समोरच्या व्यक्तीच्या मतांचा आदर करावा. मुलांबरोबर वेळ आनंदात जाईल. दिनक्रम व्यस्त राहील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. वरिष्ठ अधिकार्‍यांशी जुळवून घ्यावे लागेल. राजकीय व्यक्ती आज गुलाल उधळणार. शुभ अंक ५, शुभ रंग पिवळा

कन्या:- अनाठायी खर्चाला बळी पडू नका. कामातील नवीन संधी शोधाव्यात. व्यावहारिक सावधानता बाळगावी. वाणी संयमित असावी. प्रेमातील व्यक्तींना नवीन उत्साह लाभेल. शुभ अंक ३, शुभ रंग निळा

तूळ:- सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. जोडीदाराशी अतिवाद टाळावा. आजचा दिवस लाभदायक. नवीन प्रकल्प हाती घेऊ शकता. एखादा जुना वाद संपुष्टात येईल. शुभ अंक ६, शुभ रंग नारंगी

Today Horoscope l वृश्चिक:- तुमची मते इतरांना मान्य होतील. अति तिखट पदार्थ टाळा. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. नोकरदार वर्गाला दिलासादायक बातमी मिळेल. शुभ अंक १ , शुभ रंग हिरवा

धनू:- गूढ गोष्टींचे वाचन कराल. तुमचा सल्ला लोक ऐकतील. कामात जोखीम पत्करावी लागेल. नेहमीच्या कामात काहीसा बदल करून पाहावा. नवीन संधी हेरता आली पाहिजे. राजकीय कारकिर्दीत बाजी मारणार. शुभ अंक १, शुभ रंग पोपटी

मकर:- अतिजड पदार्थ खाऊ नयेत. विनाकारण पैसे खर्च होतील. घरातील कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. शुभ अंक ४, शुभ रंग लाल

कुंभ:- विद्यार्थांच्या इच्छा पूर्ण होतील. जोडीदाराचे मत शांतपणे ऐकावे. संमिश्र घटनांचा दिवस. आहारावर नियंत्रण ठेवावे. कामे उरकण्याची घाई कराल. शुभ अंक ७, शुभ रंग निळा

Today Horoscope l मीन:- घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. जुने परिचित लोक भेटतील. व्यापारी वर्गाला सुखकारक दिवस. सामाजिक स्तरावर मान वाढेल. संयमाने समोरील समस्येचे निराकरण करू शकाल. शुभ अंक १, शुभ रंग गुलाबी

News Title- Today Horoscope

महत्वाच्या बातम्या-

भाजपला धक्का बसण्याची शक्यता; प्रणिती शिंदे आघाडीवर

हिमाचलमध्ये कंगना रनौतला धक्का; कॉँग्रेसचे विक्रमादित्य सिंह आघाडीवर

बारामतीत कांटे की टक्कर; पहिल्या फेरीत सुप्रिया सुळे आघाडीवर

भाजपने गुलाल उधळला; या उमेदवाराने फडकावला विजयाचा पताका

मोठी बातमी! निकाल लागण्यापूर्वीच पेट्रोल-डिझेलचे दर घसरले?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now