गुड न्यूज! दोन दिवसांत सोनं ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त

On: May 24, 2026 12:28 PM
Gold Rate
---Advertisement---

Gold Rate | सराफा बाजारात गेल्या दोन दिवसांत मोठी घसरण नोंदवली गेली असून सोन्याच्या किमतीत मोठा बदल दिसून आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर कमी झाल्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत दोन दिवसांत तब्बल 8700 रुपयांची घट झाली आहे. मात्र चांदीचे दर स्थिर राहिल्याचे चित्र आहे.

24 आणि 22 कॅरेट सोन्याचे नवे दर :

24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 100 ग्रॅम 4300 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे 100 ग्रॅम सोन्याचा भाव 15,94,900 रुपयांवरून 15,90,600 रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना आता 1,59,060 रुपये मोजावे लागणार आहेत. याआधी हा दर 1,59,490 रुपये होता. म्हणजेच 10 ग्रॅममागे 430 रुपयांची घट झाली आहे.

मुंबई (Mumbai), पुणे (Pune), नागपूर (Nagpur), कोल्हापूर (Kolhapur), जळगाव (Jalgaon), सांगली (Sangli) आणि बारामती (Baramati) या शहरांमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर समान असून तो 1,59,060 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, 22 कॅरेट सोन्याच्या किमतीतही मोठी घसरण झाली आहे. प्रति 100 ग्रॅम 4000 रुपयांनी भाव कमी झाल्याने 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 14,58,000 रुपयांवर पोहोचला आहे. तसेच 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 1,46,200 रुपयांवरून 1,45,800 रुपये इतका झाला आहे.

Gold Rate | 18 कॅरेट सोन्यातही घसरण :

18 कॅरेट सोन्याच्या बाजारभावातही मोठी घट झाली असून प्रति 100 ग्रॅम दर 3300 रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे 100 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याची किंमत 11,96,200 रुपयांवरून 11,92,900 रुपये इतकी झाली आहे. त्याचबरोबर 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा भाव 330 रुपयांनी कमी होऊन 1,19,290 रुपये इतका झाला आहे. याआधी हा दर 1,19,620 रुपये होता.

सोन्याचे दर घसरले असले तरी चांदीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सध्या चांदीचा दर प्रति किलो 2,85,000 रुपये इतकाच कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी सोन्याच्या घसरलेल्या किमती महत्त्वाच्या ठरत आहेत.

News title : Gold Price Falls Sharply

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now