‘मूल होण्यासाठी नवऱ्यावर अवलंबून राहणं गरजेचं नाही’; प्रसिद्ध अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत

On: February 6, 2025 11:09 AM
Tina Datta Open to Becoming a Single Mother 
---Advertisement---

Tina Datta | ‘बिग बॉस’ (Bigg Boss) आणि ‘उतरन’ (Uttaran) सारख्या मालिकांमधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री टीना दत्ता (Tina Datta) आपल्या प्रोफेशनल लाईफसोबतच (Professional Life) वैयक्तिक आयुष्यामुळेही (Personal Life) चर्चेत असते. टीना 33 वर्षांची असून अद्याप अविवाहित आहे. मात्र, आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने मातृत्वाबाबत (Motherhood) भाष्य केले असून, ‘सिंगल मदर’ (Single Mother) होण्याचा निर्णय ती घेऊ शकते, असे तिने म्हटले आहे.

टीना दत्ताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘सिंगल मदर’ होण्यासाठी तिने अद्याप कोणतेही नियोजन केलेले नाही. पण ती सरोगसीद्वारे (Surrogacy) किंवा बाळाला दत्तक (Adoption) घेऊन आई होण्याचा विचार करत आहे. ती म्हणाली, “मला वाटतं की जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एक चांगली आई होईल. मी एकटी आई होण्याची योजना आखली नाही, परंतु मी या कल्पनेसाठी तयार आहे.”

सुष्मिता सेनकडून प्रेरणा:

अभिनेत्रीने सिंगल मदर झालेल्या महिलांचे कौतुक केले. ती म्हणाली, “मी सुष्मिता सेनसारख्या (Sushmita Sen) महिलांचं कौतुक करते, ज्यांनी दोन सुंदर मुलींना दत्तक घेतले.”

आई-वडिलांचा पाठिंबा

टीना दत्ता म्हणाली, “माझे आई-वडील एका छोट्या शहरातील आहेत आणि मी बंगाली आहे. असं असूनही, ते खूप प्रगत विचारांचे आहेत. मी मूल दत्तक घ्यायचं ठरवलं किंवा सरोगसीद्वारे मूल हवं असं ठरवल्यास ते मला पाठिंबा देतील. जर मी माझी आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेऊ शकते, तर मी मुलाचीही काळजी घेऊ शकते. यासाठी पतीवर अवलंबून राहणं गरजेचं नाही. समाज आता अशा बाबी स्वीकारत आहे.”

“आम्ही शो बिझनेसमध्ये (Show Business) असल्यामुळे आमच्या वैयक्तिक आयुष्यावर अनेकदा लक्ष ठेवलं जातं.  माझे अनेक मित्र आहेत ज्यांनी मुलं दत्तक घेतली आहेत, पण ते इंडस्ट्रीमध्ये नाहीत, त्यामुळे हेडलाइन्स येत नाहीत,” असेही टीनाने सांगितले.

टीना दत्ताच्या ‘वर्क फ्रंट’बद्दल (Work Front) सांगायचे झाल्यास, ती नुकतीच ‘पर्सनल ट्रेलर’ (Personal Trailer) या क्राईम-थ्रिलर सीरिजमध्ये (Crime-Thriller Series) दिसली होती. तिने ‘ससुराल सिमर का’, ‘डायन’, ‘हम रहे ना रहे हम’, ‘परिणीता’, ‘चोखेर बाली’ यांसारख्या मालिका आणि सिनेमांमध्ये काम केले आहे. (Tina Datta)

Title : Tina Datta Open to Becoming a Single Mother 

 

Join WhatsApp Group

Join Now