मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी रचला कट, बिबवेवाडीतील गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा

On: February 5, 2025 10:02 AM
Pune Crime
---Advertisement---

Pune Crime | अप्पर इंदिरानगर येथे एका तरुणावर गोळीबार (Firing) केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. (Pune Crime)

अटक केलेल्यांची नावे:

सनी शंकर जाधव, सलमान उर्फ सल्या हमीद शेख, हर्षल संतोष जाधव या तिघांसह त्यांच्या सात ते आठ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गोळीबारात पवन सतीश गवळी (वय २८, रा. बिबवेवाडी ओटा परिसर) हा तरुण जखमी झाला आहे.

२०२१ मध्ये पवन आणि त्याच्या साथीदारांनी पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगार माधव वाघाटे याचा खून केला होता. या प्रकरणात पवन येरवडा कारागृहात होता. तो दोन महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता. (Pune Crime)

सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना पवनवर गोळीबार करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक सूरज बेंद्रे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सोमवारी दुपारी मित्राला भेटण्यासाठी गेलेल्या माधव वाघाटेवर पाळत ठेवून गोळीबार करण्यात आला होता. त्यात तो जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी पवन गवळीवर गोळीबार केला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

News Title: Pune: Three Arrested for Shooting Youth in Revenge for Friend’s Murder

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now