पोटच्या पोरानेच दिला भयानक अंत; कोल्हापूरातील घटनेनं महाराष्ट्र हादरला

On: February 11, 2023 2:20 PM
---Advertisement---

कोल्हापूर | कोल्हापूरातील एका घटनेनं महाराष्ट्र (Maharashtra) हादरला आहे. पोटच्या लेकानेच आई-वडिलांना भयानक अंत दिल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आलीये.

कोल्हापूरमध्ये (Kolhapur) एका मुलाने आई आणि वडिलांची निर्घृणपणे हत्या (Murder) केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे आजरा तालुक्यासह बहिरेवाडी मध्ये खळबळ उडाली आहे. 

सचिन गोरुले (Sachine Gorule) असं हत्या करणाऱ्या मुलाचं नाव आहे. कृष्णा बाबू गोरुले (वय 60) आणि मुलगा सचिन (वय 32) यांच्यामध्ये कुठल्या तरी कारणावरून जोरदार वादावादी झाली होती. त्यामुळे रागाच्या भरात सचिनने वडिल कृष्णा यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे.

गेली चार वर्षे सचिन हा मानसिक दृष्ट्या संतुलन बिघडलेल्या अवस्थेत असल्याचं बहिरेवाडी ग्रामस्थांकडून सांगण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now