अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीने पोलिसांवर केले मोठे आरोप; नेमकं प्रकरण काय?

On: April 23, 2024 8:00 AM
Abhishek Ghosalkar
---Advertisement---

Abhishek Ghosalkar l गेल्या काही दिवसांपूर्वी अभिषेक घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडालाय होती. अशातच आता या प्रकरणात घोसाळकर कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांच्या तपासाबाबत धक्कादायक आरोप केले आहेत. त्यामुळे घोसाळकर हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

तेजस्विनी घोसाळकर यांनी मुंबई पोलिसांवर केले आरोप :

घोसाळकर कुटुंबीयांनी पोलिसांवर आरोप केले आहेत. मुंबई पोलीस या हत्याप्रकरणाच्या तपासात खूप घाई करत असल्याचे म्हणले जात आहे. पोलिसांनी खूपच घाईघाईत न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्याचा आरोप घोसाळकर कुटुंबीयांनी केला आहे. गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यासाठी तब्बल 90 दिवसांचा कालावधी असतो.

मात्र, मुंबई पोलिसांनी अवघ्या 60 दिवसांतच तपास आटोपून आरोपपत्र देखील दाखल केले आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर या पोलिसांवर आरोप करताना मनाला की तपासादरम्यान मुंबई पोलिसांनी नीट ऐकून देखील घेतले नाही याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात सांगण्यात आले आहे.

Abhishek Ghosalkar l घोसाळकर हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 मे रोजी होणार :

अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांच्या या आरोपानंतर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवत सखोल तपासाचे निर्देश दिले आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा सर्व बाजूंनी तपास करणे आवश्यक असल्याचं म्हंटल आहे. त्यासाठी घटनेशी संबंधित CCTV फुटेज आणि CDR ताब्यात घेत सखोल चौकशी करावी असे न्यायालयाकडून मुंबई पोलिसांना सांगण्यात आले आहे. तसेच आता अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 मे रोजी होणार आहे.

अभिषेक घोसाळकर हे शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र होते. तसेच अभिषेक घोसाळकर हे शिवसेनेचे माजी नगरसेवक देखील होते. अभिषेक घोसाळकर यांची 8 फेब्रुवारी 2024 रोजी मॉरिस नरोन्हा नावाच्या व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांच्या हा हत्येमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

News Title : Tejaswini Ghosalkar Serious Allegations On Mumbai Police

महत्त्वाच्या बातम्या-

सूर्यदेवाच्या कृपेने या दोन राशींना मिळणार चांगला पैसा

थंड घ्या… चिन्मय मांडलेकर ट्रेलिंग प्रकरणावर किरण मानेंचं बेधडक भाष्य

हे बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान नष्ट करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल!, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ

भर मैदानात रोहित शर्माला किस करण्याचा प्रयत्न, तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ

जय पवार यांची पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंवर टीका, म्हणाले…

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now