Pune | पुणे शहरात ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (Guillain Barre Syndrome) म्हणजेच ‘जीबीएस’च्या (GBS) रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना टँकरचालक (Tanker Drivers) मात्र नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. महापालिकेने (PMC) टँकरचालकांना मोफत ब्लिचिंग पावडर (Bleaching Powder) देऊनही, टँकरच्या पाण्यात ब्लिचिंग पावडरचा वापर न करता, अशुद्ध पाण्याचा पुरवठा (Supply of Impure Water) होत असल्याचे समोर आले आहे.
महापालिकेने टँकर पॉइंट (Tanker Point) चालकांना टँकरमध्ये ब्लिचिंग पावडर मिसळण्याचे आदेश दिले होते. टँकरचालकांना मोफत ब्लिचिंग पावडर देण्याचीही तयारी दर्शवली होती. मात्र, केवळ चार ते पाच टँकर पॉइंट धारकांनीच ही पावडर नेली आहे. इतर टँकर पॉइंट धारकांनी या आवाहनाकडे दुर्लक्ष केले असून, नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.
महापालिकेकडून केवळ नोटिसा, कारवाईचा बडगा नाही :
जीबीएसच्या रुग्णांची संख्या वाढत असताना व दूषित पाण्यामुळे (Contaminated Water) या जीवाणूची लागण होत असल्याची चर्चा असताना टँकरचालकांकडून होत असलेल्या या निष्काळजीपणाबाबत महापालिकेने कठोर कारवाईचा बडगा उगारणे अपेक्षित होते. मात्र, महापालिकेकडून केवळ संबंधित टँकरचालकांना नोटिसा बजावण्याचे काम केले जात आहे.
याबाबत पाणीपुरवठा (Water Supply) विभागप्रमुख नंदकिशोर जगताप (Nandkishor Jagtap) यांना विचारले असता, त्यांनी टँकर पॉइंट धारकांना नोटीस बजावण्यात आली असून ब्लिचिंग पावडरबाबतच्या सूचनाही दिल्याचे सांगितले. तसेच, याला मिळणारा प्रतिसाद पाहून पुढील कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.
Pune l ‘जीबीएस’च्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे प्रयत्न तोकडे :
जीबीएसच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेने धायरी (Dhayari), नांदेड (Nanded) परिसरातील 15 टँकर पॉइंट चालकांच्या जलस्रोतांमधील पाण्याचे नमुने (Water Samples) चाचणीसाठी घेतले होते. त्या सर्व नमुन्यांमध्ये ‘ई-कोलाय’ (E. coli) व ‘कॉलिफॉर्म’ (Coliform) जिवाणू आढळल्याने पाणी अशुद्ध असल्याचे स्पष्ट झाले.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने आता खासगी टँकर पाणी भरणा केंद्र व खासगी पाणी शुद्धीकरण प्रकल्पातील (आरओ प्लांट – RO Plant) पाण्याचे नमुने घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, हे प्रयत्न तोकडे असल्याचे दिसून येत आहे. टँकरचालकांच्या बेजबाबदारपणाला आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची आवश्यकता आहे.






