शिवसेना नेत्याच्या मुलाचं अपहरण, सगळी पोलीस यंत्रणा कामाला, तपासात वेगळंच सत्य आलं समोर

On: February 11, 2025 10:59 AM
Rishiraj Sawant
---Advertisement---

Tanaji Sawant Son l शिंदेसेनेचे (Shinde Sena) नेते आणि माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या मुलाचे अपहरण (Kidnapping) झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. पुणे पोलीस (Pune Police) कंट्रोल रूमला फोन आल्यानंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा तपासाला लागली.

सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) गुन्हा दाखल झाला. सावंत यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) आणि पोलीस आयुक्त (Police Commissioner) यांना फोन केल्याने पोलीस यंत्रणेवर दबाव निर्माण झाला. मात्र, तपासात वेगळंच सत्य समोर आलं.

चार्टर्ड विमानाने बँकॉकला निघाले :

तानाजी सावंत यांचे चिरंजीव ऋषिराज सावंत (Rishiraj Sawant) चार्टर्ड विमानाने बँकॉकला जात होते. मात्र, अपहरणाच्या संशयामुळे त्यांचे विमान पुण्याकडे (Pune) परत आले. अवघ्या 5 तासांत ऋषिराज परत आला.

Tanaji Sawant Son l नेमका काय प्रकार घडला? :

सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास ऋषिराज सावंत हे एका स्विफ्ट कारमध्ये (Swift Car) बसून विमानतळावर (Airport) गेले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाल्याची बातमी पसरली.

इतरांचीही चौकशी होणार:

ऋषिराज सावंत आणि त्यांचे दोन मित्र हे नेमके कोणत्या कारणासाठी बाहेर चालले होते? याची माहिती पुढील चौकशीत समोर येईल. ऋषिराज सावंतच्या बरोबरील व्यक्तींचीही चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती रंजनकुमार शर्मा (Ranjankumar Sharma) यांनी दिली.

News Title : Tanaji Sawant’s Son’s ‘Missing’ Drama; Chartered Plane to Bangkok, But Returned

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now