Rishiraj Sawant l राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत यांच्या अपहरणाच्या वृत्ताने सोमवारी खळबळ उडाली होती. मात्र, तपासानंतर समोर आले की, ऋषीराज सावंत आपल्या मित्रांसोबत बँकॉकला गेलो होता. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून, ऋषीराजचे अपहरण होण्याच्या चुकिच्या माहितीवरून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
नेमकं काय घडलं? :
ऋषीराज सावंत सोमवारी पुण्यातील लोहगाव विमानतळावरून चार्टर्ड प्लेनने बँकॉकला निघाले होते. पण त्यांचे अपहरण झाल्याची बातमी पसरताच, हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून त्यांचे विमान माघारी वळवण्यात आले. हे विमान रात्री लोहगाव विमानतळावर परत आले, आणि पोलिसांनी तिथेच त्याचा जबाब नोंदवला.
Rishiraj Sawant l ऋषीराजच्या चार्टर्ड विमानाची फी :
ऋषीराज सावंत यांचे बँकॉकला जाण्यासाठी चार्टर्ड विमानाचे 68 लाख रुपये ऑनलाईन भरल्याची माहिती समोर आली आहे. या तपासातून हे स्पष्ट झाले की, ऋषीराजने कोणाशीही न सांगता विमानतळावर जाण्याचा निर्णय घेतला होता, आणि त्याच्या अचानक निघाल्यामुळे तानाजी सावंत आणि त्यांचे कुटुंबीय घाबरले होते.
तानाजी सावंत यांनी आपल्या मुलाच्या ‘अपहरण’ प्रकरणी पुणे पोलिसांना तातडीने माहिती दिली. त्यांच्या मोठ्या मुलासह त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचून याबाबत तक्रार दिली. त्यानंतर, शहरात नाकाबंदी केली गेली आणि विमानतळावर तपासणी सुरू झाली. यामध्ये ऋषीराज सावंतचा बँकॉक जाण्याचा तपास समोर आला.
पुणे पोलिसांनी लोहगाव विमानतळावरून रवाना झालेल्या प्रवाशांच्या याद्या तपासल्या आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरून ऋषीराज सावंत आणि त्याचे मित्र चार्टर्ड विमानाने बँकॉकला रवाना झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात पोलिसांनी ऋषीराज सावंतची पुन्हा चौकशी करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
या प्रकरणात आता पोलिसांची पुढील चौकशी महत्त्वाची ठरेल. ऋषीराजने अशी गोष्ट का केली, आणि त्याच्या ‘अपहरण’ बाबत कुटुंबीयांनी तातडीने माहिती दिली का, यावर तपास चालू आहे. यावरून पुढे काय निष्कर्ष येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






