ताम्हिणी घाटात थरार! पुण्यातून फिरायला निघालेल्या तरुणाचा निर्घृण खून, पुढे घडलं भयंकर

On: January 13, 2026 11:57 AM
Tamhini Ghat Murder Case
---Advertisement---

Tamhini Ghat Murder Case | पुण्याहून महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघालेल्या मित्रांच्या सहलीचा शेवट ताम्हिणी घाटात रक्तरंजित घटनेत झाला. पैशांच्या वादातून सोलापूर जिल्ह्यातील तरुणाची त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनीच निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ताम्हिणी घाटातील सणसवाडी परिसरात आढळलेल्या रक्तबंबाळ मृतदेहाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा उलगडा करत माणगाव पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन आरोपींना अटक केली आहे. (Pune Mahabaleshwar Trip)

११ जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास सणसवाडी गावच्या हद्दीतील सिक्रेट पॉईंट परिसरात अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत होते. सुरुवातीला मृतकाची ओळख पटत नसल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

स्मार्टवॉच ठरले तपासातील महत्त्वाचे दुवे :

मृताच्या हातातील स्मार्टवॉचमधील माहिती या खून प्रकरणाच्या तपासात निर्णायक ठरली. स्मार्टवॉचमधील लोकेशन डेटा, हालचालींची माहिती आणि वेळेचे विश्लेषण करत पोलिसांनी मृतकाच्या शेवटच्या प्रवासाचा मागोवा घेतला. यासोबतच पुणे ग्रामीण पोलिसांची मदत घेऊन सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे संशयितांपर्यंत पोहोचण्यात माणगाव पोलिसांना यश आले.

तपासात मृतकाची ओळख गणेश भगत (वय 22, रा. इंद्रायणी नगर, भोसरी, पुणे; मूळ रा. चोवे पिंपरी, ता. माढा, जि. सोलापूर) अशी निष्पन्न झाली. पुढील चौकशीत गणेशसोबत प्रवास करणाऱ्या मित्रांमध्येच या हत्येचा सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अनिकेत वाघमारे आणि तुषार उर्फ सोन्या पाटोळे यांना माणगाव परिसरातून अटक केली आहे. (Pune Mahabaleshwar Trip)

Tamhini Ghat Murder Case | पैशांच्या वादातून घडला रक्तरंजित थरार :

पोलिस तपासानुसार, गणेश भगत, अनिकेत वाघमारे, तुषार पाटोळे, आदित्य भगत आणि प्रज्वल हंबीर हे सर्व इनोव्हा क्रिस्टा वाहनातून पुण्याहून ताम्हिणी घाट मार्गे महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघाले होते. प्रवासादरम्यान पैशांवरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की आरोपींनी कारमध्येच गणेशचा दोरीने गळा आवळल्याचे तपासात समोर आले आहे.

यानंतर सणसवाडी गावच्या हद्दीतील सिक्रेट पॉईंटजवळील मोकळ्या जागेत नेऊन कोयत्याने त्याच्या डोक्यावर, गळ्यावर आणि हातावर वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर मृतदेह घटनास्थळी टाकून आरोपी पसार झाले. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

News Title : Tamhini Ghat Murder Case: Friends Kill Solapur Youth During Trip from Pune to Mahabaleshwar

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now