विराट कोहलीच्या कारकिर्दीतील ‘ती’ एक चूक ठरली महागात? ‘या’ दिग्गजाच्या विधानाने क्रिकेट विश्वात खळबळ!

On: January 12, 2026 5:21 PM
Virat Kohli
---Advertisement---

Virat Kohli | भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठं नाव म्हणजे विराट कोहली. मैदानात तो फलंदाजीसाठी उतरला की स्टेडियममध्ये जल्लोष होतो आणि विरोधी संघाच्या गोलंदाजांवर धावांचा पाऊस पडतो. बडोद्यात न्यूझिलंडविरोधात झालेल्या सामन्यात विराट कोहलीने 93 धावांची खेळी करत पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्याच्या या दमदार खेळीच्या जोरावर भारताला विजय मिळवता आला.

मात्र सध्या विराट कोहलीच्या कामगिरीपेक्षा त्याच्या निवृत्तीच्या निर्णयाची चर्चा अधिक होताना दिसत आहे. विराट कोहली (Virat Kohli) सध्या फक्त एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसतो. त्याने कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. हाच निर्णय त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी चूक ठरली का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. (Indian Cricket News)

अॅलन डोनाल्ड यांचं मोठं वक्तव्य :

दक्षिण आफ्रिकेचे माजी दिग्गज गोलंदाज अॅलन डोनाल्ड (Allan Donald on Kohli) यांनी विराट कोहलीच्या निवृत्तीच्या निर्णयावर स्पष्ट मत मांडले आहे. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून खूप लवकर निवृत्ती घेतली, असे डोनाल्ड यांनी सांगितले. त्यांच्या मते विराटमध्ये अजूनही कसोटी क्रिकेट खेळण्याची पूर्ण क्षमता आणि भूक आहे, मात्र त्याने घेतलेला निर्णय अनेक चाहत्यांना आणि क्रिकेट तज्ञांना खटकणारा आहे.

डोनाल्ड यांनी असेही नमूद केले की विराट कोहलीमध्ये (Virat Kohli) 2027 सालाच्या एकदिवसीय विश्वचषकात खेळण्याची तीव्र इच्छा अजूनही आहे. सध्या तो ज्या पद्धतीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये कामगिरी करत आहे, त्यावरून त्याची मानसिकता आणि फिटनेस अजूनही सर्वोच्च स्तरावर असल्याचे स्पष्ट होते.

Virat Kohli | विराटमध्ये अजूनही क्रिकेटची भूक :

अॅलन डोनाल्ड यांनी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावत असताना विराट कोहलीला अगदी जवळून पाहिले आहे. त्या काळातील आठवणी सांगताना डोनाल्ड म्हणाले की, विराट कोहलीसारखी क्रिकेट खेळण्याची भूक फार कमी खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. ड्रेसिंग रूममध्ये मी त्याला नेहमी ‘चॅम्पियन’ म्हणून संबोधायचो, असे त्यांनी सांगितले.

विराट कोहली मला एखाद्या मशीनसारखा वाटायचा, असे मतही डोनाल्ड यांनी व्यक्त केले. त्याची मेहनत, तयारी आणि जिंकण्याची मानसिकता इतर खेळाडूंपेक्षा वेगळी आहे. त्यामुळेच त्याने कसोटी क्रिकेटमधून घेतलेली निवृत्ती मला आजही खटकते, अशी खंत डोनाल्ड यांनी बोलून दाखवली आहे. (Allan Donald on Virat Kohli)

एकूणच, विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय खूपच लवकर घेतला का, असा प्रश्न आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आजही त्याची फलंदाजी पाहता तो कसोटी क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी करू शकला असता, अशी भावना अनेक माजी खेळाडू आणि चाहत्यांमध्ये आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या कारकिर्दीतील हा निर्णय खरोखरच त्याची सर्वात मोठी चूक ठरली का, यावर क्रिकेटविश्वात पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.

News Title: Did Virat Kohli Retire Too Early from Test Cricket? Allan Donald Makes a Big Statement

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now