Tamannaah Bhatia | अभिनेत्री तमन्ना भाटीया (Tamannaah Bhatia) आणि विजय वर्मा (Vijay Varma) यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत. दोघांनी 2022 मध्ये डेटिंगला सुरुवात केली होती आणि त्यांच्या सुंदर केमिस्ट्रीनं चाहत्यांची मनं जिंकली होती. त्यांच्या नात्याचा अचानक झालेला शेवट चाहत्यांसाठी मोठा धक्का ठरत आहे. या चर्चांनंतर तमन्ना भाटीयाने पहिल्यांदाच प्रेम आणि नातेसंबंधांबाबत तिची भूमिका स्पष्ट केली आहे.
“त्या क्षणाला प्रेम संपतं…” तमन्ना भाटीयाचे वक्तव्य
ब्रेकअपच्या चर्चांवर विजय वर्मा आणि तमन्नाने अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली, तरी दोघांनीही सोशल मीडियावरून एकमेकांचे फोटो डिलीट केल्याचे समोर आले आहे. अशातच तमन्नाने एका मुलाखतीत प्रेमाबद्दल तिचे विचार मांडले आहेत. ती म्हणाली, “लोक प्रेम आणि नातं यामध्ये गोंधळ करतात. हे फक्त स्त्री-पुरुष नात्यासाठीच नाही, तर मैत्रीतही घडतं. जेव्हा प्रेमामध्ये अटी आणि नियम येतात, त्याच क्षणी ते संपतं.”
“त्या व्यक्तीला बंधनातून मुक्त करायला हवं”
तिने पुढे सांगितले की, “प्रेम ही एकतर्फी भावना आहे. तुम्ही कोणावर प्रेम करत असाल, तर त्या व्यक्तीला बंधनात अडकवू नका. प्रेमाचा अर्थ म्हणजे त्या व्यक्तीला जशी आहे तशी स्वीकारणे, तिच्यावर तुमचे विचार लादणे नाही.”
दरम्यान, तमन्ना आणि विजय वर्मा यांची ओळख ‘लस्ट स्टोरीज 2’ (Lust Stories 2) च्या शूटिंगदरम्यान झाली होती. दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली आणि हळूहळू ते रिलेशनशिपमध्ये आले. अनेक वेळा ते एकत्र दिसले, विमानतळ, कार्यक्रमांमध्ये स्पॉट झाले. मात्र, आता त्यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरू झाल्याने चाहत्यांमध्ये मोठी निराशा आहे.
Title : Tamannaah Bhatia Speaks on Love Amid Breakup Rumors with Vijay Varma








