Swargate rape case | स्वारगेट बस स्थानकात परगावी जाणाऱ्या २६ वर्षीय युवतीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी स्वारगेट आगारातील कार्यालयाच्या काचा फोडल्या आणि प्रशासनावर ताशेरे ओढले. त्यांच्या समर्थकांनीही अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि बस स्थानकावरील सुरक्षेच्या अभावावर गंभीर आरोप केले. (Swargate rape case)
वसंत मोरे आक्रमक
या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याने सकाळी ५.३० वाजता पीडितेला गोड बोलून निर्मनुष्य बसमध्ये बसवले आणि दरवाजे लॉक करून बलात्कार केला. घटनेनंतर तो पळून गेला. पीडितेने तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली असून, आरोपी अजूनही फरार आहे.
या घटनेनंतर वसंत मोरे यांनी आक्रमक पवित्रा घेत, आगारातील कार्यालयाच्या काचा फोडल्या. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना विचारले, “घटना घडली तेव्हा सुरक्षारक्षक कुठे होते? जर पुरेशी सुरक्षा असती, तर हा प्रकार घडला नसता!”
उद्धव ठाकरेंचा वसंत मोरेंना पाठिंबा
वसंत मोरे यांच्या आंदोलनाची नोंद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांना फोन केला आणि पाठिंबा दर्शवला. ठाकरे म्हणाले, “तुम्ही काल पुढाकार घेऊन चांगले आंदोलन केले. आपला लढा अशा प्रवृत्तीविरोधात आहे. मराठीचा अवमान आणि अशा दृष्ट प्रवृत्तींविरोधातील लढा अधिक जोमाने लढा! “त्यांनी पुण्यातील घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत सांगितले की, “हे सगळं बघून जीव जळतो…”.
स्वारगेट एसटी स्थानकाची सुरक्षा आणि स्वच्छतेची दयनीय स्थिती वसंत मोरे यांनी अधोरेखित केली. या घटनेनंतर बस स्थानकातील सुरक्षेच्या अभावावर मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे. (Swargate rape case)
सरकार आणि पोलिसांवर दबाव वाढतोय आरोपी अजूनही फरार आहे, त्यामुळे पोलिसांवर मोठा दबाव आहे. स्वारगेटसारख्या महत्त्वाच्या बस स्थानकावर सुरक्षा व्यवस्थेचा मोठा अभाव का आहे?, सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षा ही प्राथमिकता का नाही?, या प्रश्नांवर आता सरकारने उत्तर द्यावे आणि आरोपीला लवकर अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
Title : Swargate rape case Vasant More Protest Uddhav Thackeray Extends Support






