स्वारगेट अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट; तपासातून खळबळजनक माहिती समोर

On: February 27, 2025 12:06 PM
Swargate Crime Accused a History-Sheeter and Political Worker
---Advertisement---

Swargate Crime | पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील (Swargate Crime) बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (Dattatray Ramdas Gade) (वय ३७, रा. गुनाट, शिरूर (Shirur)) हा सराईत गुन्हेगार आणि राजकीय कार्यकर्ता असल्याचे तपासात समोर आले आहे. तो राजकीय व्यक्ती आणि पोलिसांच्याही संपर्कात होता.

तोंडावर मास्क असूनही पटवली ओळख

स्वारगेट बस स्थानकातील काही सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांमध्ये तोंडावर मास्क लावलेला आरोपी कैद झाला आहे. पोलिसांनी परिसरातील आणखी सीसीटीव्ही तपासले आणि खबऱ्यांकडून माहिती घेतली, त्यानंतर आरोपीची ओळख पटली.

येथे घडली घटना

दत्तात्रय गाडे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तो सराईत गुन्हेगार असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने बलात्काराच्या घटनेव्यतिरिक्तही काही मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना (Police) आहे. त्यासाठी तो आपण पोलिस असल्याचे भासवायचा. त्याच्या संपर्कात आलेल्या राजकीय व्यक्ती व पोलिस कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे.

एसटी स्टँडवर वावर

प्राथमिक चौकशीनुसार, गाडे सातत्याने स्वारगेट एसटी स्टँडवर असायचा. त्यामुळे त्याला तेथील खडान्खडा माहिती होती. त्याचाच फायदा उठवून त्याने पीडित तरुणीला एसटी स्टँडवरील निर्जनस्थळी नेऊन बलात्कार केल्याचा तर्क लावण्यात येत आहे. स्वारगेट एसटी स्टँडवर महिला, मुलींची छेडछाड होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही पोलिसांकडे येत होत्या. त्या वेळी गस्त घालून, संशयितांची चौकशी करून त्यांना हाकलून देण्यात येत असे. मात्र, हे सराईत गुन्हेगार सातत्याने तेथे येत असल्याने, पोलिसी कारवाईवरही मर्यादा येत असल्याचे म्हटले जात आहे.  (Swargate Crime)

घटनेच्या दिवशी रात्री किमान दीड-दोनपासून गाडे एसटी स्टँडवर असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर त्यानुसार तपासाची चक्रे फिरली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, त्याच्या घराची झडतीही घेण्यात आली आहे. त्याने कोणाशी संपर्क साधल्यास तातडीने पोलिसांना कळविण्याची सूचना देण्यात आली आहे. गाडेने याखेरीजही अनेक गुन्हे केले असल्याची शक्यता आहे. गाडेबाबत काही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 Title : Swargate Crime Accused a History-Sheeter and Political Worker

 

Join WhatsApp Group

Join Now