“स्वामी आपल्याला हवं ते देतात”; अमृता खानविलकरने सांगितला अनुभव

On: March 13, 2025 10:30 AM
Amruta Khanvilkar
---Advertisement---

Amruta Khanvilkar l मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर हिने नुकतेच श्री स्वामी समर्थांवरील (Shree Swami Samarth) श्रद्धेबद्दल मन मोकळे केले. ‘नटरंग’, ‘साडे माडे तीन’, ‘चोरीचा मामला’ यांसारख्या मराठी आणि ‘फूँक’, ‘राजी’ सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेल्या अमृताने एका मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या.

स्वामी समर्थांवरील श्रद्धा :

अमृता सांगते, “मी स्वामींजवळ कामाची कमतरता नसावी, एवढंच मागते. मी उत्कृष्ट पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करते आणि ते लोकांपर्यंत पोहोचावे, अशी इच्छा असते. स्वामींच्या कृपेने मला सर्व काही मिळतं – मग ते आरोग्य असो, किंवा माझ्या इच्छा.”

Amruta Khanvilkar l कृतज्ञतेची भावना :

“माझी फार मोठी लिस्ट आहे. मी स्वामींना खूप धन्यवाद देते. मला वाटतं की कृतज्ञतेची भावना तुम्हाला खूप पुढे घेऊन जाते. आपण नेहमीच काहीतरी मागत असतो, पण स्वामी आपल्याला हवं ते देतात. जेव्हा एखादी गोष्ट आपल्यासाठी योग्य नसते, तेव्हा ते ती संधी आपल्याला देत नाहीत, असे अनुभव मी घेतले आहेत.” असे अमृताने सांगितले.

काही दिवसांपूर्वी तिने नवीन घर घेतल्याची बातमी प्रेक्षकांना दिली होती आणि आता तिने नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. अमृताने मुंबईत हे नवकोर घर घेतलं असून 22 व्या मजल्यावर असलेलं हे घर अमृतासाठी नक्कीच खास आहे.

‘नव्या वर्षाची.. नवी सुरुवात. गृहप्रवेश केला आणि नव्या घराचा उंबरठा ओलांडला. स्वकष्टाने उभारलेलं हे आमचं ‘एकम’. एकम म्हणजे एक. जिथून सगळंच नव्याने सुरू होतं. उत्सुकता, समाधान, प्रेम, आणि डोळ्यात स्वप्नांचं आभाळ. तुमच्या शुभाशीर्वादांची साथ अशीच कायम राहू दे,’ अशी पोस्ट अमृताने लिहिलेली.

News title : “Swami Gives Us What We Want”: Amruta Khanvilkar Expresses Her Faith

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now